Investment Scam

विश्वासघाताचा कळस! निवृत्तीची आयुष्यभराची कमाई लुटली! पुतणीसह 13 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

निवृत्तीनंतर मिळालेल्या आयुष्यभराच्या कमाईवर डोळा ठेवत सख्ख्या पुतणीनेच आपल्या ७२ वर्षीय काकाची तब्बल ४५ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विश्वासघाताचा कळस! निवृत्तीची आयुष्यभराची कमाई लुटली! पुतणीसह 13 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Investment Scam

छत्रपती संभाजीनगर (Investment Scam) : निवृत्तीनंतर मिळालेल्या आयुष्यभराच्या कमाईवर डोळा ठेवत सख्ख्या पुतणीनेच आपल्या ७२ वर्षीय काकाची तब्बल ४५ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांवर अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ही रक्कम विविध खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी मुख्य सूत्रधार पुतणीसह एकूण १३ जणांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित कल्याणी रमेश ढोरे (सध्या रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) हिच्यासह सुमित कदम, क्रिस्टीना, कविता, राजू, वनलानुन्थरी, आशिष वाणी, अदैल्लु, मोहम्मद सिराजोद्दीन, इस्माइल न्युमो, नरेश कटारिया, रेहान खान आणि इम्रान अली या अन्य १२ जणांची नावे गुन्ह्यात नमूद करण्यात आली आहेत.

तक्रारदार श्रीकृष्ण आनंदराव ढोरे (वय ७२, रा. सुमंगल विहार, गारखेडा) हे २०१४ मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना सुमारे ४५ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. ही बाब लक्षात घेत कल्याणी ढोरे हिने त्यांच्याशी विश्वासाचे नाते अधिक दृढ करत, बँकेतील मुदत ठेवींपेक्षा इतरत्र गुंतवणूक केल्यास एका वर्षात दुप्पट-तिप्पट परतावा मिळेल, असे सांगून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.

विश्वास निर्माण करण्यासाठी कल्याणीने काकाला उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नेल्याचे तपासात समोर आले आहे. तेथे आयोजित करण्यात आलेल्या 'इंडियाज बिझनेस कॉन्क्लेव्ह' या व्यावसायिक कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याने तक्रारदारांचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला.

लखनौहून परतल्यानंतर कल्याणीने श्रीकृष्ण ढोरे यांना बँकेत नेऊन काही कोऱ्या धनादेशांवर (Blank Cheques) स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर स्वतः RTGS आणि NEFT व्यवहारांच्या स्लिप्स भरून तक्रारदारांच्या खात्यातील ४५ लाख १५ हजार रुपये तिच्या ओळखीच्या १२ वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

गुंतवणुकीनंतर सुमारे सहा महिन्यांनी श्रीकृष्ण ढोरे यांनी परताव्याबाबत विचारणा केली असता, कल्याणीने त्यांना WhatsApp वर ६८ लाख रुपयांच्या सिटी बँकेच्या चेकचा फोटो पाठवला. मात्र, काही वेळातच तो संदेश 'Delete for Everyone' करून हटवण्यात आला. यामुळे संशय बळावल्याने त्यांनी बँकेत चौकशी केली असता, त्यांच्या खात्यातील मोठी रक्कम विविध खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे उघड झाले.

फसवणुकीची खात्री झाल्यानंतर श्रीकृष्ण ढोरे यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मुख्य संशयित कल्याणी ढोरेसह एकूण १३ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या आर्थिक गैरव्यवहारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सर्व आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

संबंधित सामग्री

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ जणांना १.४४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ११ जणांना १.४४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून चंद्रपुरातील ११ जणांकडून १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप.

Sep 26, 2026
गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाखांचा अपहार; चार जणांवर गुन्हा

गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाखांचा अपहार; चार जणांवर गुन्हा

गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाख 16 हजार रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी चार पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 24, 2026
ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुण उद्ध्वस्त; ३५ ते ४० लाख गमावले

ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुण उद्ध्वस्त; ३५ ते ४० लाख गमावले

ऑनलाइन गेमिंगमध्ये ३५ ते ४० लाख रुपये गमावल्यानंतर तरुणाने नातेवाईकाच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप; जेसीबी परस्पर विकल्याचाही दावा.

Sep 18, 2026
एपीके फाईल डाऊनलोड केल्याने महिलेच्या बँक खात्यातून १ लाख ४५ हजार रुपये गायब

एपीके फाईल डाऊनलोड केल्याने महिलेच्या बँक खात्यातून १ लाख ४५ हजार रुपये गायब

Cyber Crime Case: महिलेच्या  मोबाईलवर युको बँकेच्या  नावाने एपीके फाईल आली असता त्यांनी हि फाईल डाऊनलोड केल्याने त्यांच्या बँक खात्यातील १ लाख ४५ हजार रुपये गायब

Sep 06, 2026
आधार कार्डवर ₹3 लाख कर्ज देण्याची योजना? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य PIB Fact Check ने सांगितलं

आधार कार्डवर ₹3 लाख कर्ज देण्याची योजना? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य PIB Fact Check ने सांगितलं

सोशल मीडियावर सध्या आधार कार्डच्या आधारे प्रत्येक नागरिकाला ₹3 लाखांचे कर्ज मिळणार असल्याचा दावा करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात फिरत आहे.

Aug 28, 2026