Gambling Loss

ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुण उद्ध्वस्त; ३५ ते ४० लाख गमावले

ऑनलाइन गेमिंगमध्ये ३५ ते ४० लाख रुपये गमावल्यानंतर तरुणाने नातेवाईकाच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप; जेसीबी परस्पर विकल्याचाही दावा.

ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुण उद्ध्वस्त; ३५ ते ४० लाख गमावले

Gambling Loss

नातेवाईकाच्या घरातच चोरी; चामोर्शी पोलिसांत गुन्हा दाखल

चामोर्शी : ऑनलाइन गेमिंगच्या नादात लाखो रुपये गमावल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका तरुणाने चक्क नातेवाईकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर नातेवाईकाचा जेसीबी भाड्याने देण्याच्या बहाण्याने नेऊन तो परस्पर विकल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य रविकिरण यमसनवार (२८, रा. पारवा, जि. यवतमाळ) हा यवतमाळ येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. याच काळात त्याला ऑनलाइन गेमिंगची सवय लागल्याचे सांगण्यात येते. या गेमिंगमध्ये त्याने सुमारे ३५ ते ४० लाख रुपये गमावल्याचा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.

त्याची सवय सुटावी आणि आर्थिक परिस्थिती सुधारावी, या उद्देशाने कुटुंबीयांनी मे २०२१ मध्ये त्याला चामोर्शी येथील एका नातेवाईकाकडे पाठविले होते. संबंधित नातेवाईक सरकारी कंत्राटदार असून त्यांनी आदित्यला चांदपूर फाटा येथील साईट कार्यालयात देखरेखीची जबाबदारी दिली होती. विश्वासाने काही आर्थिक व्यवहारही त्याच्याकडे सोपविण्यात आले होते.

तिजोरीतून साडेसात तोळे सोने गायब

दरम्यान, घरातील आणि कार्यालयीन आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता जाणवू लागली. ११ जानेवारी २०२३ रोजी फिर्यादीच्या आईचे निधन झाल्यानंतर घरातील तिजोरीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी दिवंगत आई, पत्नी आणि सासू यांचे तिजोरीत ठेवलेले सुमारे साडेसात तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले.

चौकशीत हे दागिने चामोर्शी येथील एका सराफा व्यापाऱ्याकडे २ लाख ५५ हजार रुपयांत विकल्याची माहिती समोर आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

भाड्याच्या बहाण्याने जेसीबीही लांबवला

डिसेंबर २०२३ मध्ये आरोपीने आरमोरी येथील एका ओळखीच्या व्यक्तीला जेसीबी भाड्याने देण्याच्या बहाण्याने नेला आणि त्यानंतर तो परस्पर कबाडात विकल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आर्थिक व्यवहार तसेच अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचीही पडताळणी केली जात आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026