मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व राज्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आज दत्ताजी मेघे यांच्यावर अंत्यसंस्कार

रविवारी सायंकाळी 22 मार्चला लोकनेते व माजी खासदार दत्ता मेघे यांचे त्यांच्या पांडे लेआउट येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व राज्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आज दत्ताजी मेघे यांच्यावर अंत्यसंस्कार

State Funeral

विदर्भाचा आधारवड हरपला ; दत्ताजी मेघेंना आज पवनारमध्ये अखेरचा निरोप

वर्धा (State Funeral) : लोकनेते व माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे रविवारी (दि. २२ मार्च) सायंकाळी नागपूर येथील पांडे लेआउट येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. २३ मार्च) सायंकाळी साडेपाच वाजता पवनार येथील त्यांच्या पितृगावी शेतावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांचे पार्थिव सावंगी (मेघे) येथील ‘संकल्प’ या निवासस्थानी नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी चार वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. सावंगी (मेघे), बजाज चौक, शिवाजी चौक, धुनीवाले मठ चौक मार्गे अंत्ययात्रा पवनारकडे प्रस्थान करणार आहे.

दरम्यान, अंत्यविधीची पूर्वतयारी पवनार येथील त्यांच्या शेतावर काल रात्रीपासून सुरू असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

या अंत्यविधीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दत्ताजी मेघे यांच्या निधनाने वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात शोककळा पसरली असून मोठ्या संख्येने नागरिक त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे अटकेत

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे अटकेत

सोशल मीडियावर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे.

Aug 27, 2026
स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, हिंगणघाट शहरात शोककळा

स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, हिंगणघाट शहरात शोककळा

 एकीकडे सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच हिंगणघाट शहरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.

Aug 15, 2026
परभणीत गोदावरी तीरावर पूज्य कालिदास महाराजांना अखेरचा निरोप; चारही वेदांच्या मंत्रघोषात अंत्यसंस्कार

परभणीत गोदावरी तीरावर पूज्य कालिदास महाराजांना अखेरचा निरोप; चारही वेदांच्या मंत्रघोषात अंत्यसंस्कार

Kalidas Maharaj: पाथरी तालुक्यातील गुंज (खुरड) येथून नाशिकचे दत्त सदायाचे संत कालिदास महाराजांना शनिवार रोजी १८ जुलैला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा अंत्ययात्रा चारी वेदांचा मंत्र घोष

Jul 19, 2026
एफडीएची कारवाई बेकायदेशीर; गोरस भंडाराला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दिलासा

एफडीएची कारवाई बेकायदेशीर; गोरस भंडाराला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दिलासा

अस्वच्छतेच्या कारणावरून ३१ मे रोजी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांनी गोरस भंडारावर केलेली बंदीची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे.

Jul 07, 2026