सायबर क्राईम प्रकरण

एपीके फाईल डाऊनलोड केल्याने महिलेच्या बँक खात्यातून १ लाख ४५ हजार रुपये गायब

Cyber Crime Case: महिलेच्या  मोबाईलवर युको बँकेच्या  नावाने एपीके फाईल आली असता त्यांनी हि फाईल डाऊनलोड केल्याने त्यांच्या बँक खात्यातील १ लाख ४५ हजार रुपये गायब

एपीके फाईल डाऊनलोड केल्याने महिलेच्या बँक खात्यातून १ लाख ४५ हजार रुपये गायब

Cyber Crime Case

पाचवेळा  सायबर भामट्याने बँक खात्यातून रक्कम काढली
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सायबर भामट्यावर गुन्हा दाखल

हिंगोली (Cyber Crime Case) : शहराजवळील रामकृष्ण नगर भागातील  एका महिलेच्या  मोबाईलवर युको बँकेच्या  नावाने एपीके फाईल आली असता त्यांनी हि फाईल डाऊनलोड केल्याने त्यांच्या बँक खात्यातील १ लाख ४५ हजार रुपये गायब झाल्याने हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सायबर भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहराजवळील रामकृष्ण नगर भागातील अश्विनी सुनिल मरळे या महिलेच्या  मोबाईलवर ३० ऑगस्ट रोजी  दुपारच्या सुमारास युको बँक नावाची एपीके पीडीएफ फाईल आली. सदरील महिलेने सदर फाईल डाऊनलोड केली  असता (Cyber Crime Case) सायबर भामट्यांनी  पहिल्या  वेळी  मरळे यांच्या  बँक खात्यातील ४९ हजार  रुपये काढले. त्यानंतर दुसर्‍या टप्यात ४० हजार रुपये,तिसर्‍या टप्यात ५ हजार रुपये, चौथ्या टप्यात १० हजार रुपये आणि पाच व्या टप्यात २५ हजार  रुपये असे एकून १ लाख ४५ हजार रुपये काढून घेतले.

पाचव्या टप्यात रक्कम काढून घेतल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर संदेश  आल्यावर त्यांनी पाहणी करताच त्या गांगारून गेल्या. त्यांनी  तात्काळ  बँकेमध्ये धाव  घेऊन बँक तपशील मागविला. ज्यामध्ये बँक खात्यातून पाच वेळा रक्कम काढल्याचे दिसून येताच त्यांनी  बँकेकडे रितसर तक्रार केली. ५ सप्टेंबर रोजी त्यांनी  हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिल्याने (Cyber Crime Case) सायबर  भामट्यावर  गुन्हा  नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक  विष्णुकांत गुठ्ठे, पोलिस उपनिरीक्षक  भालचंद्र मेथेकर, जमादार  संतोष सोनपावले हे करीत आहेत.