शेतकरी कर्जमुक्ती योजना

हिंगोली जिल्ह्यातील 44,213 शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ

Farm Loan Waiver Yojana: महात्मा फुले/अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी दि. 24 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यातील 44,213 शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ

Farm Loan Waiver Yojana

 

40 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे E-KYC अद्याप बाकी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

हिंगोली (Farm Loan Waiver Yojana) : महात्मा फुले/अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी दि. 24 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 673 गावांमधील 44,213 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

योजनेचा (Farm Loan Waiver Yojana) लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन E-KYC पूर्ण करणे, बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण करून घेणे तसेच ऑथेंटिक आयडी नसल्यास ती काढून घेणे आवश्यक आहे, असे प्रशासनाने कळवले आहे. सध्यास्थितीत हिंगोली जिल्ह्यातील 44,213 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी केवळ 4158 शेतकऱ्यांनीच E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित 40,055 शेतकऱ्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन E-KYC पूर्ण करून घ्यावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

आधार प्रमाणीकरण व ऑथेंटिक आयडीची प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असेही जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी  स्पष्ट केले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत ३० सप्टेंबरला शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा; रविकांत तुपकर राहणार उपस्थित

हिंगोलीत ३० सप्टेंबरला शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा; रविकांत तुपकर राहणार उपस्थित

Hingoli Farmers Protest March: शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोलीत भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा

Sep 20, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; 3 लाख 55 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; 3 लाख 55 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Farm Loan Waiver Yojana: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत दुसरी यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था पुणे

Sep 11, 2026
हिंगोलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 15,693 शेतकऱ्यांची यादी जाहीर

हिंगोलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 15,693 शेतकऱ्यांची यादी जाहीर

Farm Loan Waiver Yojana: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी 11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Sep 11, 2026
आमदारांच्या घरासमोरील आंदोलन तात्पुरते स्थगित

आमदारांच्या घरासमोरील आंदोलन तात्पुरते स्थगित

Hingoli Farmers Protest: प्रस्तावित डिग्रस कर्‍हाळे साठवण तलाव रद्द करण्याच्या मागणीवर ठोस निर्णय होत नसल्याने शेतकर्‍यांचा संयम संपत चालला आहे. अनेक शेतकरी कुटूंबासह बैलगाड्या घेऊन लघूपाठबंधारे विभाग

Sep 06, 2026
..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

Hingoli Farmers' March: शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांना हिंगोलीत आणून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

Aug 04, 2026