हिंगोली (Hingoli Farmers Protest March) : शेतकर्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोलीत भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निघणार आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर हे प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, सरसकट पीक विमा लागू करून तात्काळ लाभ द्यावा, कर्जमाफीचा तात्काळ लाभ देऊन नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, घरकुल लाभार्थ्यांची प्रलंबित रक्कम तात्काळ वितरित करावी आणि नवीन घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांचा समावेश करावा, तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर आणि गाय-गोठा यांचे अनुदान तात्काळ द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
यासोबतच शेतकर्यांसाठी लढणारे गजानन कावरखे यांच्यावरील तडीपारीचा आदेश रद्द करावा, अशी मागणीही या (Hingoli Farmers Protest March) मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या हक्कासाठी एकजूट होऊन मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंगोली शेतकरी मोर्चा
हिंगोलीत ३० सप्टेंबरला शेतकर्यांचा भव्य मोर्चा; रविकांत तुपकर राहणार उपस्थित
Hingoli Farmers Protest March: शेतकर्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोलीत भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hingoli Farmers Protest March