हिंगोली शेतकरी मोर्चा

..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

Hingoli Farmers' March: शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांना हिंगोलीत आणून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

Hingoli Farmers' March

 

हिंगोलीतून रविकांत तुपकर यांचा शासन व प्रशासनाला इशारा

हिंगोली (Hingoli Farmers' March) : शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांना हिंगोलीत आणून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी हिंगोलीतून शासन व प्रशासन दोघांना दिला आहे.

 हिंगोली जिल्ह्याचा भूमिपुत्र अभिजीत दिपके याने विद्यार्थ्यांना दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनासाठी हाक दिली आणि देशभरातील लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यामुळेच  देशाच्या पंतप्रधानांना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. हीच चळवळीची ताकद आहे असेही ते म्हणाले.  आमदार तानाजीराव मुटकुळे यांना उद्देशून तुपकर म्हणाले की, आम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला झोप लागणार नाही. महाराष्ट्रात आम्ही अनेक साखर कारखानदारांचा माज उतरवला आहे.

दूध संघातील माजोरी लोकांनाही आम्ही जाब विचारला आहे.  क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या राजकीय वतनदार्‍या उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.  आज या क्षणी हिंगोलीच्या विश्रामगृहावर देह सोडावा लागला तरी आम्ही तयार आहोत. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आणि शेतकर्‍यांच्या पोरांच्या नादाला लागू नका. आमचे डोके फिरले तर तुम्हाला रस्त्यावर फिरणेही मुश्कील होईल असे तुपकर म्हणाले.  यावेळी त्यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांनाही इशारा दिला. जर आम्ही ठरवले तर तुमचे उत्पन्न, पगार आणि जमवलेली संपत्ती याची चौकशी लावू. चुकीच्या पद्धतीने तडीपारी केली तर याद राखा. उभ्या महाराष्ट्रातून हजारो शेतकरी हिंगोलीत आणू आणि जोपर्यंत तडीपारी रद्द होत नाही तोपर्यंत हिंगोलीचे मैदान सोडणार नाही. आम्ही हिंगोलीतून उठणारच नाही असे ते म्हणाले.

 सध्या शेतकर्‍यांवर आणि कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही रविकांत तुपकर यांनी यावेळी केला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील कावरखे यांच्यावर पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये जबरी चोरी दरोडा बलात्कार असे कोणतेही गंभीर गुन्हे नसताना शेतकर्‍यासाठी केलेल्या आंदोलनात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून तडीपार करण्याबाबत जी नोटीस बजावलेली आहे ती नोटीस त्यांनी सन्मानपत्र म्हणून लॅमिनेशन करून घरामध्ये ठेवली आहे अशा नोटीसला आम्ही कदापिही घाबरणार नसल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. 

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे,प्रवीण मते , अशोक जयस्वाल, रमेश जाधव ,संजय मुळे, प्रवीण सोनटक्के, भागवत ढवळे, राजकुमार ढवळे, मनोहर सावके यांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

मुंबईतील शेतकरी आंदोलनाचा परिणाम; कर्जमाफी निर्णयाचे ग्रामीण भागात स्वागत

मुंबईतील शेतकरी आंदोलनाचा परिणाम; कर्जमाफी निर्णयाचे ग्रामीण भागात स्वागत

Mumbai loan waiver Andolan: मुंबईतील विधानभवनासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यव्यापी शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने यापुर्वीच जाहीर

Jul 12, 2026
परभणीत किसान सभेचे पाथरी तहसीलसमोर निदर्शने....!

परभणीत किसान सभेचे पाथरी तहसीलसमोर निदर्शने....!

Kisan Sabha Andolan: पाथरी येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी शर्ती रद्द करून सर्व शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी निदर्शने

Jul 10, 2026
मुंबई आंदोलनाचा विजय; कर्जमाफी निर्णयाचे ग्रामीण भागात स्वागत

मुंबई आंदोलनाचा विजय; कर्जमाफी निर्णयाचे ग्रामीण भागात स्वागत

Mumbai loan waiver Andolan: मुंबईतील विधानभवनासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

Jul 10, 2026
रविकांत तुपकरांच्या समर्थनार्थ रास्ता रोको; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

रविकांत तुपकरांच्या समर्थनार्थ रास्ता रोको; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Ravikant Tupkar's agitation: शेतकऱ्यांचा रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली 'अन्नत्याग' आंदोलन शासनावर वाढला आहे. मेरा खुर्दमध्ये जिल्ह्यातील एकत्रित शेतकरी आंदोलनासाठी रस्ता बंद करण्याच्या प्रयत्ना

Jun 19, 2026
कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांचा अंत बघू नका; कणखर यांचा सरकारला इशारा

कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांचा अंत बघू नका; कणखर यांचा सरकारला इशारा

Farmers' Loan Waiver Andolan: रविकांत तुपकर यांचा बेमुदत अन्नत्याग आंदोलन शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. कणखर सरकारने दबाव देण्याचा इशारा देत असून करजीमुक्ती, हक्कांचे पीकविमा

Jun 16, 2026