हिंगोली (Farm Loan Waiver Yojana) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी 11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील 650 गावांतील एकूण 15,693 शेतकऱ्यांचा या दुसऱ्या टप्प्यातील यादीत समावेश करण्यात आला असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोलीच्या सुरेखा फुपाटे यांनी ही माहिती दिली आहे.
या दुसऱ्या टप्प्यातील यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तात्काळ E-KYC पूर्ण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही त्यांनी फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. फार्मर आयडी नसल्यास दुसऱ्या टप्प्यात पात्र असूनही या (Farm Loan Waiver Yojana) योजनेचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या दुसऱ्या टप्प्यातील यादीतील जे शेतकरी मयत झाले आहेत त्यांच्या वारसांनी काळजी करण्याचे कारण नाही. त्यांनी 7/12 वर आपल्या नावाची नोंद करून घेऊन स्वतःचा फार्मर आयडी तात्काळ काढून घ्यावा जेणेकरून त्यांना वारस म्हणून कर्जमुक्तीचा लाभ घेता येईल.
दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील या (Farm Loan Waiver Yojana) यादीबाबत, कर्जमुक्तीची रक्कम, आधार प्रमाणीकरण किंवा फार्मर आयडीबाबत काही तक्रार किंवा शंका असल्यास शेतकऱ्यांनी http://flrs.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केले आहे.