हिंगोली शेतकरी आंदोलन

आमदारांच्या घरासमोरील आंदोलन तात्पुरते स्थगित

Hingoli Farmers Protest: प्रस्तावित डिग्रस कर्‍हाळे साठवण तलाव रद्द करण्याच्या मागणीवर ठोस निर्णय होत नसल्याने शेतकर्‍यांचा संयम संपत चालला आहे. अनेक शेतकरी कुटूंबासह बैलगाड्या घेऊन लघूपाठबंधारे विभाग

आमदारांच्या घरासमोरील आंदोलन तात्पुरते स्थगित

Hingoli Farmers Protest

हिंगोली (Hingoli Farmers Protest) : प्रस्तावित डिग्रस कर्‍हाळे साठवण तलाव रद्द करण्याच्या मागणीवर ठोस निर्णय होत नसल्याने शेतकर्‍यांचा संयम संपत चालला आहे. अनेक शेतकरी कुटूंबासह बैलगाड्या घेऊन लघूपाठबंधारे विभाग कार्यालया समोर आंदोलन (Hingoli Farmers Protest) करीत आहेत. जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या चर्चे दरम्यान ठोस आश्वासन मिळाले नसल्याने शुक्रवारी आंदोलकांनी आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा करून आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर ६ सप्टेंबर रविवार रोजी  आ. मुटकुळेंच्या निवासस्थाना समोर उपोषण व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी सतिष वाघ व पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांनी (Hingoli Farmers Protest) आंदोलकांशी चर्चा केली. यावर आज सोमवारी ठोस तोडगा निघणार आहे. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

टैग्स: Hingoli Farmers Protest

संबंधित सामग्री

हिंगोलीत ३० सप्टेंबरला शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा; रविकांत तुपकर राहणार उपस्थित

हिंगोलीत ३० सप्टेंबरला शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा; रविकांत तुपकर राहणार उपस्थित

Hingoli Farmers Protest March: शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोलीत भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा

Sep 20, 2026