अखंड हरिनाम सप्ताह

भानखेड्यात 'विठ्ठलनामा'च्या गजरात 'ईदी'चा गोडवा!

Akhand Harinam Saptah: भानखेड्यात अखंड हरिनाम सप्ताह आणि ईदच्या संयोगाने हिंदू-मुस्लिम समुदायाने एकत्र येऊन सामाजिक सलोख्याची अनोखी दृष्टांत निर्माण केली.

भानखेड्यात 'विठ्ठलनामा'च्या गजरात 'ईदी'चा गोडवा!

Akhand Harinam Saptah

अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम बांधवांनी जोपासली सामाजिक सलोख्याची परंपरा

सेनगाव (Akhand Harinam Saptah) : टाळ-मृदंगाचा गजर, विठू नामाचा जयघोष आणि याच सोहळ्यात मुस्लिम बांधवांनी वाटलेला शिरखुरमा... असे भक्ती आणि सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे घडले. निमित्त होते अखंड हरिनाम सप्ताह आणि रमजान ईद या दोन्ही सणांच्या एकत्र येण्याचे. शनिवारी (२१ मार्च) येथे हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला. शिरखुरमा वाटून दिला एकतेचा संदेश

मागील दोन वर्षांप्रमाणे याही वर्षी सप्ताहाच्या (Akhand Harinam Saptah) कालावधीतच रमजान ईद आल्याने मुस्लिम बांधवांनी सप्ताहातील वारकरी आणि भाविकांना शिरखुरमा देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला. केवळ धार्मिक विधी न मानता, एकमेकांच्या धर्माचा सन्मान करत मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांशी गळाभेट घेतली आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या. मान्यवरांची उपस्थिती या हृदयस्पर्शी सोहळ्यासाठी ह.भ.प. भागवताचार्य नाना सूर्यवंशी महाराज, सेनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि  मस्के, ओम पाटील कोटकर, पोलीस पाटील शिवानंद कोटकर, केंद्रप्रमुख ओंकार कोटकर, परमेश्वर टिळक यांच्यासह गावातील मुस्लिम बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"भानखेडा गावाने दाखवून दिलेली ही एकता आजच्या काळाची गरज आहे. वारकरी संप्रदाय हा मुळातच माणुसकी शिकवतो आणि त्याचेच प्रतिबिंब आज इथे उमटले आहे."
-ओम कोटकर

या (Akhand Harinam Saptah) उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात भानखेडा गावाच्या एकतेचे आणि सामंजस्याचे कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा; डिवायएसपी मनीष ठाकरे यांचे आवाहन

गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा; डिवायएसपी मनीष ठाकरे यांचे आवाहन

मानोरा येथे शांतता समितीच्या बैठकीत डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर, सोशल मीडिया अफवांपासून सतर्कता आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन.

Sep 13, 2026
गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

कळमनुरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासह ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करण्याचे आवाहन केले.

Sep 13, 2026
महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी आता FDAची परवानगी आवश्यक; तुकाराम मुंढेंचा नवा ॲक्शन प्लॅन

महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी आता FDAची परवानगी आवश्यक; तुकाराम मुंढेंचा नवा ॲक्शन प्लॅन

सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, तसेच अन्नभेसळीला आळा घालता यावा यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरासाठी विशेष नियोजन केले आहे.

Sep 03, 2026
कळमनुरीत  ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य जुलूस कार्यक्रमात हजारो सहभागी 

कळमनुरीत  ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य जुलूस कार्यक्रमात हजारो सहभागी 

Kalmanuri Eid-e-Miladunnabi: ईद मिलाद निमित्त शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने आज 26 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढीत व विविध धार्मिक कार्यक्रम घेत मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

Aug 26, 2026
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीत हिंदू मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीत हिंदू मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

Eid-e-Miladunnabi: जश्ने ईदे मिलादुन्नबीच्या पावन पर्वानिमित्त हिंगोली शहरात आज भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रामलीला मैदानावरून या मिरवणुकीला प्रारंभ झाला.

Aug 26, 2026