Peace Committee Meeting

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

कळमनुरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासह ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करण्याचे आवाहन केले.

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

Peace Committee Meeting

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या अध्यक्षतेखाली कळमनुरीत शांतता समितीची बैठक

कळमनुरी : आगामी गणेशोत्सव तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी येथील तहसील कार्यालयात ११ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी, मौलाना, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी सण-उत्सवांच्या काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी, कायदा-सुव्यवस्था तसेच आवश्यक उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मौलाना करीमोदिन यांनी गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये, अशी मागणी केली. उत्सवाच्या काळात अखंडित विद्युतपुरवठा राहिल्यास मंडळांना तसेच नागरिकांना मोठी सुविधा होईल, असे त्यांनी सांगितले. नंदकिशोर तोष्णीवाल यांनीही विविध उपाययोजना व सूचना मांडल्या. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील उत्सव आयोजनासंदर्भातील आपल्या समस्या व अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.

बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर टाळावा, असे स्पष्ट आवाहन केले. मोठ्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणासह नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उत्सव साजरा करताना कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश मंडळांनी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना किंवा समस्या निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनाकडून उत्सव काळात परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून, कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक लोढा यांनी दिला. शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला पोलीस उपअधीक्षक नारायण देशमुख, तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ, फौजदार मदन गव्हाणे, संदीप मोदे, शरद मरे, नदीम रजवी आदी उपस्थित होते.

शांतता समितीची बैठक यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत माखणे, नामदेव कोटकर, गजानन होळकर, विलास बांगर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026