कळमनुरी  ईद-ए-मिलादुन्नबी

कळमनुरीत  ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य जुलूस कार्यक्रमात हजारो सहभागी 

Kalmanuri Eid-e-Miladunnabi: ईद मिलाद निमित्त शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने आज 26 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढीत व विविध धार्मिक कार्यक्रम घेत मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

कळमनुरीत  ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य जुलूस कार्यक्रमात हजारो सहभागी 

Kalmanuri Eid-e-Miladunnabi

कळमनुरी (Kalmanuri Eid-e-Miladunnabi) : ईद मिलाद निमित्त शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने आज 26 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढीत व विविध धार्मिक कार्यक्रम घेत मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली. ईद ए मिलाद निमित्त दरवर्षी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.
 
आज सकाळी  जुलुसे मोहम्मदी रजा मैदान वरून निघाला व शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरून मार्गक्रमण करीत रजा मैदान वर पोहचला. या मिरवणुकीत हजारो मुस्लीम बांधव व लहान मुले, मुली सहभागी होत अत्यंत शिस्तीने प्रेषित मोहंमद पैगंबर यांचा जयघोष करीत, नात पठण करीत होते. तर (Kalmanuri Eid-e-Miladunnabi) मिरवणुकीत विविध धार्मिक देखावे ही लक्ष वेधून घेत होते. मिरवणूक निमित्त अवघ्या शहरात कमानी, पताके व विद्युत रोषणाई ने सजविण्यात आले होते. तर मिरवणूक दरम्यान ठिकठिकाणी मिष्टान्न चे पॉकेट पाण्याचे बॉटल आदी चे वाटप करण्यात आले होते. मिरवणुकीची सांगता रजा मैदानावर इस्लामिक ध्वज फडकावून करण्यात आली. यावेळी सामूहिक प्रार्थना करण्यात आली व देशात शांतता एकता साठी ही प्रार्थना करण्यात आली. तर या नंतर खीर व खिचडी चे लंगर ची व्यवस्था  रजा मैदान   व बागबान   मोहल्ला  भागात करण्यात आले होते.
 
यावेळी सिरत कमिटी चे अध्यक्ष अफजल रहमान, तस्सवर रजवी, आबेद नाईक, अय्युब खान, शेख मुखतार, वहिद पठाण, नविद पठाण, शेख मुखतार, शाहरुख रजवी,साजेद रजा, गफ्फार कुरेशी सह  मौलाना करिमोद्दीन,मौलाना शाकेर रजा, मौलाना मंजूर अहमद, हाफीज राशीद खान अय्युब बरकाती,शफिक रजा, हाफीज तोफिक बागबान, हाफीज हनिफ रजा, हाफीज गुलाम यासिन, हाफीज अस्लम, आदी ची उपस्थिती होती. मिरवणूक दरम्यान स पो उप अधीक्षक मयूर रसाळ, पोलिस निरीक्षक जमीर नाईक ,  प्रेमप्रकाश माकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे,पोलिस  कर्मचारी दिलीप पोले, गजानन होळकर,, विलास बांगर आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित सामग्री

'हे देवा, आम्हा पाप्यांसाठी नव्हे, तर किमान या मुक्या जनावरांसाठी तरी पाऊस पडू दे!'

'हे देवा, आम्हा पाप्यांसाठी नव्हे, तर किमान या मुक्या जनावरांसाठी तरी पाऊस पडू दे!'

Ausa Muslim community: तालुक्यातील भादा येथे मुस्लिम बांधवांनी पाऊस यावा, यासाठी ईदगाह मैदानावर बुधवारी (दि.९)  सकाळी ९ वाजता विशेष नमाज अदा केली. यात प्रार्थना करताना येथील ईमाम समीर मौलाना

Sep 09, 2026
बुलढाण्यात शिंदेसेनेची मोठी राजकीय हालचाल; मुस्लिम समाजातील शेकडो जण शिवसेनेत

बुलढाण्यात शिंदेसेनेची मोठी राजकीय हालचाल; मुस्लिम समाजातील शेकडो जण शिवसेनेत

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाने पक्षाचा जनसंपर्क विस्तारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची राजकीय हालचाल केली आहे.

Sep 03, 2026
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीत हिंदू मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीत हिंदू मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

Eid-e-Miladunnabi: जश्ने ईदे मिलादुन्नबीच्या पावन पर्वानिमित्त हिंगोली शहरात आज भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रामलीला मैदानावरून या मिरवणुकीला प्रारंभ झाला.

Aug 26, 2026
गेल्या 10-12 वर्षांत (मोदी-शाह राजवट) भारत एक 'मनहूस' देश...? -Prof. निवेदिता मेनन

गेल्या 10-12 वर्षांत (मोदी-शाह राजवट) भारत एक 'मनहूस' देश...? -Prof. निवेदिता मेनन

professor Nivedita Menon: मुलाखतीत त्यांनी भारताचे वर्णन करण्यासाठी 'हा दयनीय देश' यांसारखे शब्द वापरले, ज्यामुळे वाद निर्माण झाला. मुस्लिम समुदाय,10-12 वर्षांतील (मोदी-शाह सरकार) वातावरण, बुलडोझर

Aug 05, 2026
ऑगस्ट 2026 मध्ये बँका तब्बल 14 दिवस बंद; RBI च्या सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

ऑगस्ट 2026 मध्ये बँका तब्बल 14 दिवस बंद; RBI च्या सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

ऑगस्ट 2026 मध्ये बँकेशी संबंधित कामे करण्याचा विचार करत असाल, तर आधी सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासणे आवश्यक ठरणार आहे.

Jul 27, 2026