ईद-ए-मिलादुन्नबी

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीत हिंदू मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

Eid-e-Miladunnabi: जश्ने ईदे मिलादुन्नबीच्या पावन पर्वानिमित्त हिंगोली शहरात आज भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रामलीला मैदानावरून या मिरवणुकीला प्रारंभ झाला.

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीत हिंदू मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

Eid-e-Miladunnabi

हिंगोली (Eid-e-Miladunnabi) : जश्ने ईदे मिलादुन्नबीच्या पावन पर्वानिमित्त हिंगोली शहरात आज दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रामलीला मैदानावरून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

सकाळच्या सुमारास रामलीला मैदानावर मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. वयोवृद्ध नागरिकांपासून ते लहान बालकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रामलीला मैदानावरून निघालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान 'सरकार की आमद मरहबा' सह विविध धार्मिक घोषणा देण्यात आल्याने संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

या (Eid-e-Miladunnabi) मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे मिरवणूक अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

यावेळी मिरवणुकीतून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला. सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत उपनगराध्यक्ष अब्दुल माबुद बागवान यांच्या वतीने भाविकांसाठी फळ आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. तर गटनेते श्रीराम बांगर यांच्या वतीने मोतीचूरच्या लाडूचे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. उन्हाची तमा न बाळगता सहभागी झालेल्या नागरिकांसाठी ही व्यवस्था दिलासादायक ठरली.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष अब्दुल माबुद बागवान, नगरसेवक सुभाष बांगर, नगरसेवक गणेश बांगर, नगरसेवक रवी वाढे, साद अहमद, साजिद बिल्डर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच गटनेते श्रीराम बांगर यांच्या वतीने ईद मिलादुन्नबी कमेटीचे अध्यक्ष हाजी मो. खिजर, सचिव अहेमद ख़ान, नसीर ख़ान, अशफाक रजा, शेख़ सिराज, शाही खान व इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे शहरात हिंदू मुस्लिम ऐक्य अधिक दृढ झाले असून हा सण अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

संबंधित सामग्री

कळमनुरीत  ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य जुलूस कार्यक्रमात हजारो सहभागी 

कळमनुरीत  ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; भव्य जुलूस कार्यक्रमात हजारो सहभागी 

Kalmanuri Eid-e-Miladunnabi: ईद मिलाद निमित्त शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने आज 26 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढीत व विविध धार्मिक कार्यक्रम घेत मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

Aug 26, 2026
हिंगोलीत रामलीला मैदानावरील लिंबाच्या झाडाला आग; तत्परतेमुळे अनर्थ टळला

हिंगोलीत रामलीला मैदानावरील लिंबाच्या झाडाला आग; तत्परतेमुळे अनर्थ टळला

Hingoli tree fire: हिंगोलीच्या रामलीला मैदानावरील लिंबाच्या झाडाला आग लागली. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. नियमित पाहणीची मागणी.

Apr 19, 2026