Standing Orders for All Festivals

महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी आता FDAची परवानगी आवश्यक; तुकाराम मुंढेंचा नवा ॲक्शन प्लॅन

सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, तसेच अन्नभेसळीला आळा घालता यावा यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरासाठी विशेष नियोजन केले आहे.

महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी आता FDAची परवानगी आवश्यक; तुकाराम मुंढेंचा नवा ॲक्शन प्लॅन

सण-उत्सवांसाठी वर्षभराचे ‘Standing Orders for All Festivals’; महाप्रसादातील अन्नगुणवत्तेपासून मिठाई, खवा, पनीर, तूप आणि मांसाहारी पदार्थांवर FDAची नजर

सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, तसेच अन्नभेसळीला आळा घालता यावा यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरासाठी विशेष नियोजन केले आहे. FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३ सप्टेंबरपासून ‘Standing Orders for All Festivals’ या विशेष उपक्रमाची अंमलबजावणी जाहीर केली आहे. या अंतर्गत महाप्रसाद, भंडारा किंवा सार्वजनिक ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या सामूहिक भोजन कार्यक्रमांसाठी FDAची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.

सामूहिक भोजनासाठी केटररची नियुक्ती करण्यात आली असल्यास, स्वयंपाकासाठी वापरला जाणारा कच्चा माल नेमका कुठून खरेदी करण्यात आला, याची माहितीही प्रशासनाला द्यावी लागणार आहे. महाप्रसाद आणि भंडाऱ्यांमध्ये तयार होणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचीही FDAकडून तपासणी केली जाणार आहे.

सणांच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा तसेच मटण आणि चिकन यांसारख्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन FDAने वर्षभराचे स्वतंत्र कॅलेंडर तयार केले आहे. त्यानुसार राज्यातील विविध सणांचे तीन स्तरांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.

तुकाराम मुंढेंनी सांगितली ‘सेफ फूड अँड सेफ ड्रग’ची संकल्पना

नव्या व्यवस्थेबाबत माहिती देताना FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सणांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यासाठी महाराष्ट्रात ‘Safe Food and Safe Drug’ ही संकल्पना राबवली जाणार आहे.

सणांच्या दिवसांत खाद्यपदार्थांची मागणी अचानक वाढत असल्याने त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. यापूर्वी विविध सणांच्या काळात अन्न सुरक्षा नियमांनुसार स्वतंत्रपणे कारवाई केली जात होती. मात्र, संपूर्ण वर्षातील सण लक्षात घेऊन सणनिहाय आणि पद्धतशीर नियोजनाची व्यवस्था नव्हती.

हीच बाब लक्षात घेऊन ३ सप्टेंबरपासून वर्षभरातील सण-उत्सवांसाठी विशेष अन्न सुरक्षा ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आला आहे. या व्यवस्थेत कोणत्याही एका धर्माच्या सणासाठी स्वतंत्र किंवा वेगळे नियम ठेवण्यात आलेले नसून सर्व सणांसाठी समान पद्धतीने अन्न सुरक्षा कारवाई केली जाणार आहे.

तीन स्तरांमध्ये सणांचे वर्गीकरण

FDAने तयार केलेल्या वार्षिक कॅलेंडरमध्ये सणांचे तीन स्तर निश्चित करण्यात आले आहेत.

प्रथम श्रेणी – राज्यव्यापी सण:
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्ष पूर्वसंध्या.

द्वितीय श्रेणी – प्रादेशिक सण:
मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती.

तृतीय श्रेणी – स्थानिक सण:
स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस.

सणाच्या २१ दिवस आधीपासून कारवाईला सुरुवात

FDAची विशेष कारवाई सणाच्या २१ दिवस आधी सुरू होणार असून सण संपल्यानंतरही ३० दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेचे चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.

पहिला टप्पा:
धोका अधिक असलेल्या अन्नपदार्थांचे नकाशांकन केले जाईल. विशेष पथके नियुक्त केली जातील आणि प्रयोगशाळांना आधीच सूचना दिली जाईल.

दुसरा टप्पा:
गिरण्या, घाऊक बाजारपेठा आणि खाद्यपदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले जाईल. पहाटेच्या वेळेत विशेष नाका तपासणीही केली जाणार आहे.

तिसरा टप्पा:
सणाच्या दिवशी विशेष भरारी पथकांकडून प्रत्यक्ष ठिकाणी अचानक तपासणी केली जाईल.

चौथा टप्पा:
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषींविरोधात खटले दाखल केले जातील. त्यानंतर कारवाईचा अहवाल FDA आयुक्तांकडे सादर केला जाईल.

या नव्या नियोजनामुळे महाप्रसाद, भंडारे आणि विविध सणांच्या काळात मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर FDAचे अधिक काटेकोरपणे लक्ष राहणार आहे.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता; शंभरीपार जाण्याची भीती

साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता; शंभरीपार जाण्याची भीती

ऊस उत्पादन घटल्याने, कमी स्टॉक आणि इथेनॉल निर्मितीमुळे साखरेचे दर शंभरीपार जाण्याची शक्यता; दिवाळीच्या फराळावर महागाईची झळ बसू शकते.

Oct 01, 2026