सरसकट मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्या
शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना ठेवले नजरकैदेत
मानोरा (Washim District Dry Drought) : तब्बल गेल्या दिड महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने सर्वत्र कोरड्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना मुख्यमंत्री साहेब जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येवून पिक पाहणी करत आहात हे आमचें अहो भाग्यच म्हणावे लागेल, कारण तुमचे पाय आमच्या शेतात पडतं आहे."संत आले घरा तोची दिवाळी दसरा" मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्या घरी आलात परंतु आमची दिवाळी, दसरा साजरी करू शकत नाही.
कारण शेतात पेरलेलं सोयाबीन न उगल्याने दुबार पेरणीच्या झाळेत आधीच आम्हीं भाजलोत आता पावसाच्या खंडामुळे उभे सोयाबीन करपले त्यामुळे आम्हाला माफ करा आम्ही तुमचं गोडधोड करू शकत नाही आमच्या मुलांचे शिक्षण लेखीबाळींचे लग्न कार्य व आजारी आई वडिलांचे दवाखाना असे एक ना एक प्रसंग आता आमच्या डोळ्यासमोर उभे ठाकले आहेत. साहेब या पंचनामाच्या भानगडीत न आम्हाला पाडता (Washim District Dry Drought) सरसकट दुष्काळाची मदत जाहीर करा, अशी आर्थ हाक परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा दौऱ्या संदर्भात व्यक्त केली आहे.
..अन हो मुख्यमंत्री साहेब लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी लढणे हा गुन्हा का? दुष्काळाजन्य परिस्थितीत आंदोलन करणे गुन्हा का? जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आले तर कधी हमीपत्र तर कधी नजर कैदेत ठेवणे हा कुठला न्याय बरं साहेब? आता तुम्ही डोळ्याने शेतकऱ्याची शेती बघणार ना? या पार्श्वभूमीवर तरी तात्काळ कोरडा दुष्काळ (Washim District Dry Drought) जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तात्काळ मंजूर करून सरसकट मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी मागणी शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी केली असून आंदोलनाच्या धसक्याने अनेक शेतकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवले आहेत.