हिंगोली कोरड्या दुष्काळ

शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी जि.प.च्या महिला शिक्षिका बळीराजाच्या बांधावर

Hingoli Dry Drought: हिंगोली जिल्ह्यात मागील २० दिवसात १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना, कोरड्या दुष्काळामुळे हतबल झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी जि प महिला शिक्षिका शेतकऱ्यांच्या बांधावर

शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी जि.प.च्या महिला शिक्षिका बळीराजाच्या बांधावर

Hingoli Dry Drought

हिंगोली (Hingoli Dry Drought) : हिंगोली जिल्ह्यात मागील २० दिवसात १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरड्या दुष्काळामुळे हतबल झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेची एक महिला शिक्षिका सुट्टीच्या दिवशी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहे. सिंधुताई दहिफळे असे या महिला शिक्षिकेचे नाव असून, त्या स्वतः एक कवयित्री देखील आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी त्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करत आहेत.

मागील तीन आठवड्यांपासून दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सिंधू दहिफळे यांनी आतापर्यंत १५ पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी दिल्या आहेत. (Hingoli Dry Drought) शेतकऱ्याच्या बांधावर दाखल होत कवितेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका, अशी आर्त साद घालत आहेत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाला शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक शेतकरी त्यांना आत्महत्या करणार नाही, असे वचन देत आहेत. दहिफळे यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टैग्स: Hingoli Dry Drought

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; आमदार संतोष बांगर यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी

हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; आमदार संतोष बांगर यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी

Hingoli Dry drought: हिंगोली जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिके वाळून चालली असून जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर

Sep 15, 2026
हिंगोली जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा; शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची शिवसेना उबाठाची मागणी

हिंगोली जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा; शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची शिवसेना उबाठाची मागणी

Hingoli Dry Drought: हिंगोली जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच हिंगोली जिल्ह्यातून प्रस्तावित असलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द

Sep 11, 2026