मानोरा तालुका कोरडा दुष्काळ

मानोरा तालुक्यातील सर्व ६ महसूल मंडळात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Manora Taluka Dry Drought: मानोरा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प व अनियमित राहिल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..

मानोरा तालुक्यातील सर्व ६ महसूल मंडळात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Manora Taluka Dry Drought

 

अल्प व अनियमित पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
शेतकरी संकटात; तातडीने मदत व उपाययोजना करण्याची मागणी

मानोरा (Manora Taluka Dry Drought) : कारंजा - मानोरा विधानसभा मतदार संघातील मानोरा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प व अनियमित राहिल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पादन येत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मानोरा तालुक्यातील सर्व ६ महसूल मंडळामध्ये सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर  करून पिक विम्यासह आर्थिक मदत द्यावी, असे मागणीचे निवेदन दि. २४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारण जाधव कारंजा दौऱ्यावर आले असताना भारतीय जनता पार्टीचे पोहरादेवी मंडळाचे तालुकाध्यक्ष गणेश जाधव तालुकाध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच गणेश पुरुषोत्तम जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, मानोरा तालुक्यातील सर्व ६ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई, जनावरांसाठी चारा व पाण्याची कमतरता यामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक हतबल झाले आहे. त्यामुळे मानोरा तालुक्यातील सर्व महसूल मंडळात तातडीने दुष्काळ जाहीर करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार पीक नुकसान भरपाई व दुष्काळी अनुदान, पीक कर्जाबाबत सवलती, वीज बिलात सवलत, जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्यात यावी.

तसेच शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मानोरा तालुक्यातील सर्व ६ महसूल मंडळांमध्ये सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक मदत व उपाययोजना करण्यात याव्यात, असे निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी मानोरा मंडळाचे तालुकाध्यक्ष अरविंद इंगोले, सुरेशराव गावंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य अभिषेक चव्हाण, पोहरादेवी मंडळाचे सरचिटणीस महेंद्र राठोड, सामील राठोड आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी जि.प.च्या महिला शिक्षिका बळीराजाच्या बांधावर

शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी जि.प.च्या महिला शिक्षिका बळीराजाच्या बांधावर

Hingoli Dry Drought: हिंगोली जिल्ह्यात मागील २० दिवसात १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना, कोरड्या दुष्काळामुळे हतबल झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी जि प महिला शिक्षिका शेतकऱ्यांच्या बांधावर

Oct 02, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026
बुलढाणा जिल्ह्यात सरसकट नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांसह देविदास कणखर, विनायक सरनाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

बुलढाणा जिल्ह्यात सरसकट नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांसह देविदास कणखर, विनायक सरनाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Buldhana district dry drought: जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

Sep 24, 2026
उद्या कोरड्या दुष्काळाचा जीआर; शेतकऱ्यांना सरसकट मदत, फडणवीसांची मोठी घोषणा

उद्या कोरड्या दुष्काळाचा जीआर; शेतकऱ्यांना सरसकट मदत, फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्या कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Sep 24, 2026
मुख्यमंत्री साहेब, आकांक्षीत वाशिम जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करा!

मुख्यमंत्री साहेब, आकांक्षीत वाशिम जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करा!

Washim District Dry Drought: तब्बल गेल्या दिड महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने सर्वत्र कोरड्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना मुख्यमंत्री साहेब..

Sep 24, 2026