ITR Filing 2026

३१ जुलैची ITR अंतिम तारीख संपली; उशिरा रिटर्न भरल्यास किती दंड?

आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही निश्चित करण्यात आलेली अंतिम मुदत आता संपली आहे.

३१ जुलैची ITR अंतिम तारीख संपली; उशिरा रिटर्न भरल्यास किती दंड?

CBDT कडून अंतिम मुदत वाढवण्यात आलेली नाही; उशिरा रिटर्न भरल्यास लेट फी, व्याज आणि रिफंडमध्ये विलंब होण्याची शक्यता

आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही निश्चित करण्यात आलेली अंतिम मुदत आता संपली आहे. या तारखेपर्यंत रिटर्न दाखल न करणाऱ्या नोकरी करणाऱ्या कर्मचारी, पेन्शनधारक, विद्यार्थी तसेच व्यवसायातून उत्पन्न नसलेल्या करदात्यांना आता बिलेटेड ITR (Belated ITR) दाखल करावा लागणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) यंदा ITR भरण्याची अंतिम तारीख वाढवलेली नाही.

गेल्या काही दिवसांत आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी अनेक करदात्यांनी केल्या होत्या. पोर्टल संथ गतीने सुरू असणे तसेच विविध त्रुटी (Errors) दिसून येत असल्याने अंतिम मुदत वाढवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरही सरकारने मुदतवाढ जाहीर केलेली नाही.

उशिरा ITR भरल्यास काय परिणाम होऊ शकतात?

३१ जुलैनंतर दाखल करण्यात येणारा आयकर रिटर्न बिलेटेड ITR म्हणून स्वीकारला जाईल. अशा वेळी करदात्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार ५,००० रुपयांपर्यंत लेट फी भरावी लागू शकते. याशिवाय कराची थकबाकी असल्यास त्यावर व्याज आकारले जाऊ शकते.

उशिरा रिटर्न भरल्यामुळे टॅक्स रिफंड (Refund) मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असते. तसेच काही करसवलतींचा लाभ मिळण्यातही अडचणी येऊ शकतात.

सर्व करदात्यांसाठी ३१ जुलै अंतिम मुदत नाही

३१ जुलैची अंतिम तारीख प्रत्येक करदात्यासाठी लागू होत नाही. ज्या व्यक्तींचे व्यवसायातून उत्पन्न आहे, मात्र त्यांना टॅक्स ऑडिटची आवश्यकता नाही, अशा करदात्यांसाठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे.

याशिवाय ज्या व्यावसायिक किंवा संस्थांसाठी टॅक्स ऑडिट अनिवार्य आहे, त्यांच्यासाठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. तर ट्रान्सफर प्रायसिंग रिपोर्ट सादर करणाऱ्या करदात्यांना ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत आयकर रिटर्न दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

संबंधित सामग्री

धनदांडग्यांना चाप; श्रीमंतांचे धान्य बंद, ‘मिशन सुधार’अंतर्गत ११,६०० लाभार्थ्यांना फटका

धनदांडग्यांना चाप; श्रीमंतांचे धान्य बंद, ‘मिशन सुधार’अंतर्गत ११,६०० लाभार्थ्यांना फटका

निलंग्यात ‘मिशन सुधार’अंतर्गत २,२७८ अपात्र शिधापत्रिकाधारकांवर कारवाई; सुमारे ११,६०० लाभार्थ्यांचा मोफत धान्याचा लाभ बंद.

Sep 22, 2026
अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!

अखेर पालिका प्रशासन नरमले, शिवसेनेच्या मागण्या मान्य!

Latur Municipal Shiv Sena: लातूर महापालिका ने शिवसेनाच्या मागण्यांना मान्य करण्याच्या प्रक्रिया सुरू केली. महापालिकेच्या आयुक्तांनी विकास शुल्कचा चक्का, शहरातील सर्विस रोडवर अतिक्रमण

Aug 13, 2026
ITR Filing 2026: ३१ जुलै अखेरची मुदत; उशीर केल्यास दंडासह होऊ शकते आर्थिक नुकसान

ITR Filing 2026: ३१ जुलै अखेरची मुदत; उशीर केल्यास दंडासह होऊ शकते आर्थिक नुकसान

आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी आता फारच कमी कालावधी शिल्लक असून, सरकार अंतिम क्षणी मुदतवाढ जाहीर करेल, अशी अपेक्षा ठेवणे करदात्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

Jul 27, 2026
₹12.75 लाखांपर्यंत पगार म्हणजे पूर्ण टॅक्समाफीच? नवीन कर प्रणालीतील महत्त्वाचा नियम जाणून घ्या

₹12.75 लाखांपर्यंत पगार म्हणजे पूर्ण टॅक्समाफीच? नवीन कर प्रणालीतील महत्त्वाचा नियम जाणून घ्या

काही विशिष्ट उत्पन्नावर स्वतंत्र कर दर लागू असल्याने अशा प्रकरणांमध्ये करदात्यांना आयकर भरावा लागू शकतो.

Jul 15, 2026
ITR भरल्यानंतर ही एक चूक पडू शकते महागात; रिफंड अडकण्यासह दंडाचीही शक्यता

ITR भरल्यानंतर ही एक चूक पडू शकते महागात; रिफंड अडकण्यासह दंडाचीही शक्यता

जुलै महिना सुरू होताच आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेते

Jul 10, 2026