गहू-तांदळाऐवजी कडधान्यांकडे वळा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश 

देशातील शेती धोरणात बदल करण्याची गरज अधोरेखित करत सर्वोच्च न्यायालयाने ने केंद्र सरकारला गहू व तांदूळ पिकांवरील अवलंबित्व कमी करून कडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत.

गहू-तांदळाऐवजी कडधान्यांकडे वळा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश 

Agricultural Policy

नवी दिल्ली (Agricultural Policy) : देशातील शेती धोरणात बदल करण्याची गरज अधोरेखित करत सर्वोच्च न्यायालयाने ने केंद्र सरकारला गहू व तांदूळ पिकांवरील अवलंबित्व कमी करून कडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत. किसान महापंचायतीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. देशाला सध्या जितक्या प्रमाणात गहू व तांदूळ उत्पादनाची गरज आहे का, याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने सांगितले की, उत्तर व मध्य भारतात गहू-तांदळाऐवजी कडधान्ये हा उत्तम पर्याय ठरू शकतो. दक्षिण भारतातही इतर पिकांच्या जागी कडधान्यांची लागवड वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. यासाठी Ministry of Agriculture and Farmers' Welfare अंतर्गत विविध मंत्रालयांमध्ये समन्वय व सुसूत्रता असणे अत्यावश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

शेतकऱ्यांना प्रोत्साहनाची गरज 

लहान शेतकऱ्यांनी कडधान्यांकडे वळावे यासाठी त्यांना योग्य आर्थिक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. किमान आधारभूत किंमत (MSP) प्रभावी असावी, तसेच उत्पादन विक्री वेळेत होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले.

पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर चिंता 

सरकारने मार्च २०२६ पर्यंत पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीस दिलेली परवानगी देशांतर्गत कडधान्यांच्या किमतींवर परिणाम करत असल्याची चिंता याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली. याची दखल घेत न्यायालयाने केंद्राला विद्यमान धोरणाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.

नवीन धोरणाची अपेक्षा

या संदर्भात सर्व संबंधित घटकांची बैठक घेऊन सध्याच्या धोरणात सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पीक विविधीकरणाला चालना देणारे नवे धोरण आणण्याची अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे. पाण्याचा वाढता ताण, मातीची गुणवत्ता आणि पोषण सुरक्षा लक्षात घेता कडधान्य उत्पादन वाढविणे हा दीर्घकालीन उपाय मानला जात असल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे.

संबंधित सामग्री

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

Sep 29, 2026
धनदांडग्यांना चाप; श्रीमंतांचे धान्य बंद, ‘मिशन सुधार’अंतर्गत ११,६०० लाभार्थ्यांना फटका

धनदांडग्यांना चाप; श्रीमंतांचे धान्य बंद, ‘मिशन सुधार’अंतर्गत ११,६०० लाभार्थ्यांना फटका

निलंग्यात ‘मिशन सुधार’अंतर्गत २,२७८ अपात्र शिधापत्रिकाधारकांवर कारवाई; सुमारे ११,६०० लाभार्थ्यांचा मोफत धान्याचा लाभ बंद.

Sep 22, 2026
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदी हटवली, भारतीय शेतकऱ्यांसाठी नवी संधी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदी हटवली, भारतीय शेतकऱ्यांसाठी नवी संधी

गव्हाच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अनेक वर्षांपासून लागू असलेली निर्यातबंदी हटवण्यात आली आहे.

Aug 24, 2026
परभणीत शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होईपर्यंत निर्धाराने लढा देऊ चा नारा....!

परभणीत शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होईपर्यंत निर्धाराने लढा देऊ चा नारा....!

Parbhani Shaktipith Highway: परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे रविवारी (दि.१६) शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती तर्फे आयोजित एल्गार परिषद करण्यात आली..

Aug 16, 2026