परभणीत शक्तिपीठ महामार्ग

परभणीत शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होईपर्यंत निर्धाराने लढा देऊ चा नारा....!

Parbhani Shaktipith Highway: परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे रविवारी (दि.१६) शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती तर्फे आयोजित एल्गार परिषद करण्यात आली..

परभणीत शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होईपर्यंत निर्धाराने लढा देऊ चा नारा....!

Parbhani Shaktipith Highway

 

पोखर्णी येथील एल्गार परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी...!

परभणी (Parbhani Shaktipith Highway) : परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे रविवारी (दि.१६) शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती तर्फे आयोजित एल्गार परिषद करण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून झाले. यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात आसूड उगारण्यात आला. 

एल्गार परिषदेला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर,माजी खासदार तुकाराम रेंगे,माजी आमदार विजय गव्हाणे,किसान सभचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर,काॅ. गिरीष फोंडे, काॅ. अजय बुरांडे, शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  किशोर ढगे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या काॅ. माधुरी क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली देशमुख, युवक काँग्रेसचे अमोल जाधव,माजी महापौर रवि सोनकांबळे, समाजवादी जन परिषदेचे आप्पाराव मोरताटे,शिवसेनेचे माजी आमदार कल्याण रेंगे, माजी आमदार व्यंकटराव कदम,वंचित बहुजन आघाडीचे नागोराव पांचाळ, शिवसेना (उबाठा) शिवलिंग बोधने,गोविंद घाटोळ, ओंकार पवार,विठ्ठलराव गरुड,सतीश घाटगे ,विजय बेले, गणेश पाटील, हेमचंद्र शिंदे, गणेश घाटगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हे सरकार  इंग्रजापेक्षा वाईट वागत आहे. सत्तेमध्ये ठग,पेंढारी बसले सरकारच्या भूलथापा,गंडवागडवीस बळी पडू नये. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होण्यासाठी १२ जिल्ह्यातील शेतकरी एकवटले असून एक इंचही जमीन देणार नाही असा निर्धार करून सर्वांनी एकजुटीने लढा उभारावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

महादेव जानकर म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना अहंकार आला आहे.आयुष्यात भाजप सोबत जाणार नाही.  या (Parbhani Shaktipith Highway) महामार्गाला शेतकऱ्यांनी जमीन देऊ नयेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधात ठराव घ्यावेत. यावेळी अखिल भारतीय किसान सभचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ राजन क्षीरसागर म्हणाले,गोळीबार झाला तरी हा महामार्ग होऊ द्यायचा नाही.कर्जमाफीसाठी पैसे नाहीत.शक्तीपीठ महामार्गावर एक लाख २० हजार कोटी रुपये खर्च केला जात आहे. 

 कॉ अजय बुरांडे म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तिपीठची नसून सिंचनाची गरज आहे. फोंडे म्हणाले,खरी लढाई शेतकऱ्यांच्या बांधावरील लढाई शेतकरी जिंकणार आहेत.  रेंगे,शक्तिपीठ गरज नसताना शेतकऱ्यांवर हा महामार्ग लादला जात आहे.गव्हाणे म्हणाले, शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे षडयंत्र  रचले जात आहे.  माजी खासदार तुकाराम रेंगे, विजयराव गव्हाणे, अमोल जाधव शिवलिंग बोधने, शिवाजी कदम, यांनी विचार मांडले. 

सहजपूर जवळा येथील लढाऊ शेतकरी महिला स्वाती चांगभले व अन्य दोघींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. परिषदेचे सुत्र संचालन काॅ ओंकार पवार यांनी केले. यावेळी परभणी जिल्हातील शक्तिपीठ महामार्ग बाधीत गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  एल्गार परिषदच्या यशस्वीतेसाठी काॅ. माधुरी क्षीरसागर, किशोर ढगे, सोनाली देशमुख, सतीश घाटगे, विजयराव बेले, गोविंद घाटूळ, विठ्ठलराव गरूड, काॅ. शिवाजी कदम,हेमचंद्र शिंदे, गणेश पाटील, कैलास चांगभले, काॅ. प्रसाद गोरे, काॅ. भारत पवार, काॅ. दयानंद यादव, सोपान मोरे, दत्ता वाघ काॅ. प्रज्ञा अंभोरे, तसेच सर्वच शक्तीपीठ महामार्ग बाधित गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे आणि संपूर्ण अहवालानंतर मदत देण्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

Sep 28, 2026