कन्हान इसम मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत जख्मी अनोळखी इसमाचा मृत्यु

Kanhan Man Death: नागपुर-जबलपूर महामार्गावर डुमरी रेल्वे स्टेशन जवळील अनोळख्या इसमाने गंभीर धडक दाखल करून एका मृत्याची खबर सांगितली गेली. अपघातानंतर उपचारातूनही निघले नाही.

अज्ञात वाहनाच्या धडकेत जख्मी अनोळखी इसमाचा मृत्यु

Kanhan Man Death

 

ओळखत असणा-यानी कन्हान पोलीस स्टेशनला संपर्क करावा

कन्हान (Kanhan Man Death) : पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी रेल्वे स्टेशन परिसरातील नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जख्मी झालेल्या एका अनोळखी इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

माहितीनुसार, डुमरी रेल्वे स्टेशनजवळील हरियाणा ढाब्याजवळ मागिल १० ते १५ दिवसांपासुन एक अनोळखी इसम फिरत होता. तो (Kanhan Man Death) मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसुन येत होते व परिसरात अन्न मागुन आपली उपजीविका करत होता. १६ मे रोजी रात्री ११. ४५ वाजता अज्ञात वाहनाने जोरदार धडक मारली. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यास तत्काळ मेयो रुग्णालय नागपुर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला.

मृत इसमाचे (Kanhan Man Death) वय अंदाजे ६० ते ६५ वर्ष असुन त्याचा रंग सावळा, डोक्यावरील केस पिकलेले असुन चेहऱ्या वर पांढरी दाढी व मिशी आहे. अंगात फाटलेले कपडे असुन हात-पायांची नखे वाढलेली होती. सदर मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नसुन त्याची ओळख कोणाला असल्यास त्यांनी तात्काळ कन्हान पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे   हयांनी केले आहे.

संबंधित सामग्री

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर  अज्ञात वाहनाने पायदळ चालणार्‍या इसमास जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. 

Aug 23, 2026
नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत  दुचाकी स्वाराचा मृत्यू

नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत  दुचाकी स्वाराचा मृत्यू

National Highway Accident: रंगा फाटा–नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील नांदेड–हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हिवरा फाटा येथे भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडकेत मृत्यू झाला.

Aug 17, 2026
आयशरची दुचाकीला भीषण धडक, एकाचा मृत्यू

आयशरची दुचाकीला भीषण धडक, एकाचा मृत्यू

Parbhani Bike Accident: आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जण जखमी झाले. वसमत -परभणी महामार्गावरील रस्त्यावरील झिरो फाटा टोल नाक्या जवळ घडली.

Aug 16, 2026
कन्हान हद्दीतील अपघातातील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु

कन्हान हद्दीतील अपघातातील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु

Kanhan Woman Death: नागपुर जबलपुर महामार्गावर अपघातात गंभीर जख्मी महिलेला कामठी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केल्यावर उपचारा दरम्यान महिलेचा मुत्यु

Aug 05, 2026
परभणीत ट्रक अपघातात एक जखमी; हायवाची कारला धडक

परभणीत ट्रक अपघातात एक जखमी; हायवाची कारला धडक

Parbhani Truck Accident: रेल्वे स्टेशन समोर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अपघात झाल्याची घटना मंगळवार २१ दुपारी अडिचच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी

Jul 21, 2026