राष्ट्रीय महामार्ग अपघात

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर  अज्ञात वाहनाने पायदळ चालणार्‍या इसमास जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. 

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

National Highway Accident

 

खानापूर चित्ता जवळील घटना

खानापूर चित्ता (National Highway Accident) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर  अज्ञात वाहनाने पायदळ चालणार्‍या इसमास जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी  घडली. 

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर कळमनुरी कडून खानापूर चित्ताकडे रात्रीच्या वेळेस पायदळ चालत  असताना कोणत्यातरी अज्ञात वाहनाने पाठीमागून येऊन  जोराची धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सदरील घटना २२ ऑगस्ट  रोजीच्या रात्री अंदाजे साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याच वेळे दरम्यान  हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे ११२ क्रमांक असलेले वाहन गस्त घालीत होते. *National Highway Accident( वाहनांमधील पोलीस कर्मचारी किशोर पवार, समादेशक राऊत यांना सदरील अपघात घडल्याचे लक्षात येताच त्यांनी १०८ शासकीय रुग्णवाहिकेला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. १०८ रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल होताच दोन्ही  कर्मचार्‍यांनी मयत झालेल्या इसमास हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकी मधून  दाखल केले.

परंतु वाहनाची धडक एवढी जोराची होती की, त्या धडकेमध्ये सदरील इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घोषणा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी केली. मयताची तपासणी केली असता मयताच्या खिशात कोणतेही कागदपत्रे आढळून आले नाही. यामुळे मयत हा नेमका कुठला? आहे. असा प्रश्न पोलीस प्रश्न समोर पडला आहे. त्याचबरोबर  मयत व्यक्तीच्या नावाचा व गावाचा शोध घेणे पोलिसाला अवघड झाले आहे. मयताच्या उजव्या हातावर फक्त गोंधनातून काढलेले निलेश कविता एवढेच नाव आहे. यामुळे पुढील शोध काढणे पोलिसांना सुतावरून स्वर्ग गाठणे असे झाले आहे.  एकंदरीत  अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून, या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सदरील घटनेचा तपास बीट अंमलदार शंकर गायकवाड करीत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026