डोंगरकडा (National Highway Accident) : वारंगा फाटा–नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील नांदेड–हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हिवरा फाटा येथे भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. हा (National Highway Accident) भीषण अपघात सोमवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास घडला. व्यंकटी माधवराव गंगातीर (४५) राहणार मुगट जी. नांदेड असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार वारंगा फाटा कडून नांदेडच्या दिशेने कार (क्र. एमएच ४९ बीबी ०७६०) व दुचाकी (क्र. एमएच २६ सीटी ६६६३) जात होती.दुचाकीवर व्यंकटी गंगातीर मावस बहीण व त्यांचा लहान मुलगा प्रवास करीत होते. यावेळी कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. (National Highway Accident) धडकेमुळे दुचाकी सुमारे २० फूट अंतरावर फेकली गेली. या अपघातात दुचाकीस्वार व्यंकटी गंगातीर यांचा मृत्यू झाला.स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार,कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने दुचाकीला धडक दिली अशी प्राथमिक माहिती आहे.धडक इतकी भीषण होती की,कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात दोन ते तीन पलट्या खात सुमारे २० फूट अंतरावर जाऊन पडली.
कारमध्ये चार प्रवासी होते. प्रशांत तिडके (वय ४५), ईशा प्रशांत तिडके (वय ४०) आणि आरोह प्रशांत तिडके (वय १४) हे गंभीर जखमी झाले असून अन्य एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. (National Highway Accident) अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमींना उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास सुरू आहे.