परभणी ट्रक अपघात

परभणीत ट्रक अपघातात एक जखमी; हायवाची कारला धडक

Parbhani Truck Accident: रेल्वे स्टेशन समोर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अपघात झाल्याची घटना मंगळवार २१ दुपारी अडिचच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी

परभणीत ट्रक अपघातात एक जखमी; हायवाची कारला धडक

Parbhani Truck Accident

 

परभणी शहरातील रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अपघात...!

परभणी (Parbhani Truck Accident) : शहरातील रेल्वे स्टेशन समोर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अपघात झाल्याची घटना मंगळवार २१ दुपारी अडिचच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर दुसर्‍या अपघातात हायवाच्या धडकेत कारचे नुकसान झाले आहे. 

स्टेशन समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून रस्ता ओलांडत असलेल्या एकाला एम.एच. ०४ जे.के. ७४६३ या क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात संबंधिताच्या पायाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली. या (Parbhani Truck Accident) ठिकाणी उपस्थित असलेले शहर वाहतूक शाखेचे पोउपनि. अविनाश बनाटे, पोलीस अंमलदार अनिल गायकवाड, शेख मुस्ताक, अण्णा देशमुख, श्रीहरी मुंढे, सय्यद जाफर, नवनाथ लोखंडे यांनी तात्काळ जखमीला रुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत केली.

याच रस्त्यावर थोड्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एम.एच. ४४ ए.जे. ९९९० या क्रमांकाच्या हायवाने एका कारला धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मात्र कारचे नुकसान झाले. या ठिकाणी उपस्थित असलेले शहर वाहतूक शाखेचे पोउपनि. सिद्दिकी, पोलीस अंमलदार फड यांनी वाहतूक सुरळीत केली. एकाच रस्त्यावर दोन ठिकाणी अपघात झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली.