रिसोड जनगणना २०२७

रिसोड तालुक्यात जनगणना २०२७ मोहिमेला वेग

Risod Census 2027: रिसोड तालुक्यात जनगणना २०२७ मोहिमेत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित केले गेले. बीएलओंच्या दुधरबदारीत अचूक कार्य

रिसोड तालुक्यात जनगणना २०२७ मोहिमेला वेग

Risod Census 2027

 

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तहसीलदारांच्या हस्ते विशेष सन्मान

रिसोड (Risod Census 2027) : केंद्र शासनाच्या जनगणना २०२७ मोहिमेंतर्गत रिसोड तालुक्यात जनगणना कार्याने मोठी गती घेतली आहे. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कर्मचारी अत्यंत जबाबदारीने व तत्परतेने हे काम करत आहेत. दरम्यान, अल्पावधीत उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध काम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तहसील प्रशासनाच्या वतीने जाहीर सन्मान करण्यात आला. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट कामाची प्रेरणा मिळत आहे.

पहिल्या टप्प्यातील उत्कृष्ट मानकरी

जनगणना मोहिमेचा पहिला टप्पा (Risod Census 2027) वेळेत पूर्ण करण्यात तालुक्यातील विविध गावातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये प्रामुख्याने खालील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे: ​किरण मोरे (चाकोली): त्यांनी बीएलओची (BLO) दुहेरी जबाबदारी सांभाळत संपूर्ण तालुक्यात जनगणना मोहिमेचा पहिला टप्पा सर्वात प्रथम पूर्ण करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. मदन आरू (रिठद): स्वतः बीएलओची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांनी जनगणनेचे काम अत्यंत अचूक आणि वेळेत पूर्ण केले. ​ज्योती आचमारे (बोरखेडी), शीतल सोळंकर (हराळ) व वर्षा राठोड (मोहजा बंदी): यांनीही त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत पहिला टप्पा वेळेत पूर्ण केला. ​या सर्व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर आणि नायब तहसीलदार रावसाहेब देशपांडे ,सुभाष जाधव यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी (Risod Census 2027) तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी  उत्तम नप्ते,अनिल लहाने, सुनील लोखंडे ,समाधान जावळे गजानन गरकळ यांची उपस्थित होती. ​"आम्ही केलेल्या कामाची प्रशासनाने योग्य वेळी दखल घेत आमचा सन्मान केला, यामुळे निश्चितच आम्हाला अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातही शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये आम्ही अशीच जबाबदारीने व प्रामाणिकपणे कामगिरी बजावत राहू."
-वर्षा राठोड (मोजाबंदी), सन्मानित कर्मचारी

संबंधित सामग्री

अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करीचा मोठा पर्दाफाश; 526 किलो अमली पदार्थांसह 5 पाकिस्तानी नागरिक ताब्यात

अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करीचा मोठा पर्दाफाश; 526 किलो अमली पदार्थांसह 5 पाकिस्तानी नागरिक ताब्यात

अरबी समुद्रात मोठी कारवाई! 526 किलो ड्रग्ज जप्त, 5 पाकिस्तानी नागरिक अटकेत; आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये.

Oct 02, 2026
शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

तावशीतील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तासन्‌तास उन्हात थांबले; भेट न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत करपलेल्या पिकांची होळी केली.

Sep 24, 2026
कॅनडात विमान प्रशिक्षणादरम्यान अपघात; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, दूतावासाकडून मदतीचे आश्वासन

कॅनडात विमान प्रशिक्षणादरम्यान अपघात; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, दूतावासाकडून मदतीचे आश्वासन

कॅनडात विमान प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात तामिळनाडू व पुदुचेरीतील दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.

Sep 21, 2026
चिखली येथील आयटीआयच्या गेटवर चार दिवस गाडी; अखेर पोलिसांनी नेली ठाण्यात!

चिखली येथील आयटीआयच्या गेटवर चार दिवस गाडी; अखेर पोलिसांनी नेली ठाण्यात!

चिखलीत आयटीआय व जिल्हा परिषद शाळेचा रस्ता चार दिवस बंद; मनसेच्या मागणीनंतर पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. जागेच्या मालकीवरूनही वाद निर्माण झाला आहे.

Sep 21, 2026
रिसोड विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी शिबिरे ठरतायत ‘फार्स’; केंद्रांवर बीएलओ गायब, नवीन मतदार नोंदणीविनाच परतले

रिसोड विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी शिबिरे ठरतायत ‘फार्स’; केंद्रांवर बीएलओ गायब, नवीन मतदार नोंदणीविनाच परतले

रिसोड विधानसभा मतदारसंघातील विशेष मतदार नोंदणी शिबिरांमध्ये काही केंद्रांवर बीएलओ गैरहजर असल्याने नागरिकांना नोंदणीविनाच परतावे लागल्याचा आरोप. उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले.

Sep 19, 2026