कैफे मुंबई राडा

कैफे मुंबई येथे ध्वनीप्रदूषणावरून राडा; कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास

Cafe Mumbai Rada: नंद्राबाद येथे ध्वनिप्रदूषणामुळे युवकांच्या गटातील संघर्ष उद्भवला, परंतु पोलिसांच्या तातडीने हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात आणली गेली.

कैफे मुंबई येथे ध्वनीप्रदूषणावरून राडा; कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास

Cafe Mumbai Rada

पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात

छत्रपती संभाजीनगर (Cafe Mumbai Rada) : जिल्ह्यातील नंद्राबाद येथील कैफे मुंबई येथे ध्वनीप्रदूषणावरून राडा झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील काही हुल्लडबाज युवकांनी दुचाकीवरून मोठ्या आवाजात ध्वनीप्रदूषण करत परिसरात त्रास निर्माण केल्याचे सांगितले जात आहे..

नंद्राबाद गावात मोठ्या प्रमाणावर वृद्ध नागरिक वास्तव्यास असून, अशा प्रकारच्या कर्णकर्कश आवाजामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. संबंधित युवक हे कैफे मुंबई (Cafe Mumbai Rada) येथे येणारे ग्राहक असल्याचे सांगितले जात असले, तरी त्या ठिकाणी त्यांच्या वर्तनावर कोणताही आक्षेप घेतला गेला नव्हता.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बोढके यांनी पुढाकार घेत ही बाब खुलताबाद पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. बिट अंमलदार झाकीर सर आणि सदावर्ते सर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Cafe Mumbai Rada) पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या प्रकरणी पुढील कारवाई खुलताबाद पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार? असीम सरोदेंच्या पोस्टनंतर चर्चेला वेग; मात्र बापटांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर नाही.

Sep 24, 2026
ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाचा कडक बडगा; लाऊडस्पीकर लावण्याआधी ₹1 लाख भरा! नियमभंग झाल्यास डिपॉझिट जप्त

ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाचा कडक बडगा; लाऊडस्पीकर लावण्याआधी ₹1 लाख भरा! नियमभंग झाल्यास डिपॉझिट जप्त

लाऊडस्पीकर परवानगीसाठी मंडळांना ₹1 लाख, व्यक्तींना ₹50 हजार डिपॉझिट. नियमभंग झाल्यास रक्कम जप्त; फटाके आणि लेझर लाईटवरही हायकोर्टाचे निर्बंध.

Sep 24, 2026
गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

कळमनुरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासह ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करण्याचे आवाहन केले.

Sep 13, 2026
हिंगोलीत गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचे कडक निर्देश; नियम मोडल्यास कारवाई

हिंगोलीत गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचे कडक निर्देश; नियम मोडल्यास कारवाई

हिंगोली शहर पोलिसांनी गणेशोत्सव २०२६ साठी सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप, मूर्तीची उंची, विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपक आणि सुरक्षेबाबत कडक निर्देश दिले आहेत.

Sep 12, 2026
गणेशोत्सव, श्री गणेशावरील वक्तव्य भोवले; विद्यानंद बापट यांना ४८ तासांचा अल्टिमेटम

गणेशोत्सव, श्री गणेशावरील वक्तव्य भोवले; विद्यानंद बापट यांना ४८ तासांचा अल्टिमेटम

गणेशोत्सव आणि भगवान श्री गणेश यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत ॲड. प्रदीप नाईक यांनी विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Sep 10, 2026