Legal Notice

गणेशोत्सव, श्री गणेशावरील वक्तव्य भोवले; विद्यानंद बापट यांना ४८ तासांचा अल्टिमेटम

गणेशोत्सव आणि भगवान श्री गणेश यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत ॲड. प्रदीप नाईक यांनी विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

गणेशोत्सव, श्री गणेशावरील वक्तव्य भोवले; विद्यानंद बापट यांना ४८ तासांचा अल्टिमेटम

मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांची नोटीस; समाधानकारक उत्तर न दिल्यास फौजदारीसह कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. प्रदीप नाईक यांनी विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास फौजदारीसह अन्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे.

पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान वाजवण्यात येणाऱ्या डीजे साउंड सिस्टिमला विद्यानंद बापट यांचा विरोध आहे. या विषयावर त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीतील काही मुद्दे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून व्हायरल झाले आहेत.

या मुलाखतीदरम्यान गणेशोत्सव, हिंदूंच्या धार्मिक परंपरा तसेच भगवान श्री गणेश यांच्याविषयी करण्यात आलेली काही वक्तव्ये धार्मिकदृष्ट्या अवमानकारक आणि आक्षेपार्ह असल्याचा दावा ॲड. प्रदीप नाईक यांनी कायदेशीर नोटीसमध्ये केला आहे.

दरम्यान, ध्वनीप्रदूषण, लाऊडस्पीकर, मिरवणुका अथवा सार्वजनिक उत्सवांशी संबंधित विषयांवर कायदेशीर चौकटीत आणि सभ्य पद्धतीने मत व्यक्त करण्याच्या अधिकाराला आपला विरोध नसल्याचे नाईक यांनी नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आधार घेत कोणाच्याही धार्मिक श्रद्धा किंवा आराध्य दैवतांचा अवमान करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

एका व्यक्तीला प्राप्त असलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य वापरताना इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांनी नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करावी आणि हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी ॲड. प्रदीप नाईक यांनी केली आहे.

नोटीसमध्ये दिलेल्या मुदतीत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ॲड. प्रदीप नाईक यांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026