Ganeshotsav 2026

हिंगोलीत गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचे कडक निर्देश; नियम मोडल्यास कारवाई

हिंगोली शहर पोलिसांनी गणेशोत्सव २०२६ साठी सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप, मूर्तीची उंची, विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपक आणि सुरक्षेबाबत कडक निर्देश दिले आहेत.

हिंगोलीत गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचे कडक निर्देश; नियम मोडल्यास कारवाई

Ganeshotsav 2026

मंडप, मूर्तीची उंची, ध्वनीक्षेपक, विद्युत रोषणाई आणि सुरक्षेबाबत गणेश मंडळांना स्पष्ट सूचना

हिंगोली : जिल्ह्यात गणेशोत्सव २०२६ चा उत्साह सुरू होण्यापूर्वीच हिंगोली शहर पोलीस ठाण्याकडून सार्वजनिक गणेश मंडळांसाठी कडक निर्देश जारी करण्यात आले आहेत. यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि नियमांचे काटेकोर पालन करून साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या गणेशोत्सव स्थापना पत्रानुसार गणेश मंडळाच्या स्थापनेमुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांच्या सर्व सूचनांचे पालन करणे मंडळांसाठी बंधनकारक राहणार आहे. मंडप उभारताना अतिक्रमित जागेचा वापर करता येणार नाही. मंडपासाठी जागा वापरताना जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मंडप ज्वालाग्राही साहित्यापासून उभारता येणार नाही. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन मंडळाचा दर्शनी भाग मुख्य रस्त्यापासून आत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंडपाचा स्टेज जमिनीपासून तीन फूट उंच असावा, तर भाविकांनी थेट आत प्रवेश करू नये यासाठी समोरील अडथळा तीन फुटांपेक्षा उंच ठेवणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी मंडपाच्या उघड्या भागावर पडदा लावण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मूर्तीच्या उंचीबाबतही पोलिसांनी स्पष्ट नियम घालून दिले आहेत. वाहनासह गणेशमूर्तीची उंची बारा फुटांपेक्षा अधिक नसावी. विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेच्या आणि टेलिफोनच्या तारांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

गणेश मंडळ आणि मूर्तीच्या सुरक्षेसाठी चोवीस तास दोन स्वयंसेवकांची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या स्वयंसेवकांची नावे गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवशी पोलीस ठाण्यात सादर करावी लागतील. मंडळाकडून लकी ड्रॉ किंवा लॉटरीसारखे प्रकार आयोजित केल्यास तो दखलपात्र गुन्हा मानला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शांतता समितीच्या बैठकीसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आल्यास त्यांची उपस्थिती बंधनकारक राहणार आहे.

विद्युत रोषणाईसाठी अधिकृत परवानगी घेणे आवश्यक असून शॉर्टसर्किट होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लहान मुले, नागरिक तसेच जनावरांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने सुरक्षित रोषणाई करावी लागणार आहे.

रात्री बारा वाजल्यानंतर मंडपातील संपूर्ण दिवे बंद करून केवळ एक लाईट सुरू ठेवावा आणि मंडपाचा पडदा बंद करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. भाविकांच्या दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत. याशिवाय सर्व गणेश मंडळांची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी असणे आवश्यक आहे.

ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ध्वनीक्षेपक वापरण्याची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे. ध्वनीक्षेपकाचा आवाज पन्नास डेसिबलपेक्षा अधिक ठेवता येणार नाही. रात्री दहा वाजल्यानंतर लाऊडस्पीकर पूर्णपणे बंद करणे बंधनकारक राहणार असून कोणत्याही परिस्थितीत डी.जे. वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी सर्व गणेश मंडळांनी पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026