राष्ट्रीय महामार्ग अपघात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३६१वरील भाटेगाव कालव्यावरील वळणावर पुन्हा अपघात

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील अपघाताची मालिका सुरूच असताना जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अद्यापही कुंभकर्णी झोपेमध्येच दिसून येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३६१वरील भाटेगाव कालव्यावरील वळणावर पुन्हा अपघात

National Highway Accident

 

लातूरहून रायपूरला 'दाळवं' घेऊन जाणारा ट्रक झाला पलटी

डोंगरकडा (National Highway Accident) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील अपघाताची मालिका सुरूच असताना जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अद्यापही कुंभकर्णी झोपेमध्येच दिसून येत आहे.  या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्‍या कंपनीवर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

२७, २८, २९ ऑगस्ट रोजी सातत्याने तीन अपघात झाले त्यात पत्ता गोबी आणि पपईचे मोठे नुकसान झाले. ३१ ऑगस्ट रोजी लातूरहून रायपूरला दाळव्याची वाहतुक करणारा ट्रक क्रमांक एमएच २४ एयु २५४०  हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील भाटेगाव कालव्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक महामार्गावरील असलेल्या दुभाजक वर आदळून अपघात झाला आहे. सुदैवाने यात जीवित हाणी किंवा कोणतीही दुखापत झाली नाही.

या (National Highway Accident) वळणावर सातत्याने अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले कित्येकजण जायबंदी झाले तर कित्येक अपघात आपसात मिटवून निघून गेले असून या ठिकाणी २० ते ३० मृत्यू झाल्यानेच प्रशासन जागे होणार आहे का? असा प्रश्न जनता करीत आहे. तसे झाले तर या ठिकाणी भविष्यात येथे जनतेकडून रास्तारोको होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. अपघात झाला की वाहनांच्या लागणार्‍या रांगा आणि पोलिसांना येथील वाहतून सुरळीत करण्यासाठी येथे आता पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

संबंधित सामग्री

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

Vehicle E-challan: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात आलेला ई-चालानाचा दंड वेळेत न भरल्यास वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. बकाया वाहतूक दंडाची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय

Oct 02, 2026
ई-चलनाकडे दुर्लक्ष केलंय? सुप्रीम कोर्टाने सुचवले १० कडक उपाय; वीज बिलापासून वाहन जप्तीपर्यंत पर्याय

ई-चलनाकडे दुर्लक्ष केलंय? सुप्रीम कोर्टाने सुचवले १० कडक उपाय; वीज बिलापासून वाहन जप्तीपर्यंत पर्याय

₹२० हजार कोटींच्या ई-चलन थकबाकीवर सुप्रीम कोर्टाच्या १० सूचना; RC, DL, PUC, Parivahan आणि वाहन जप्तीपर्यंत पर्याय.

Sep 29, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
नाकाबंदी दरम्यान १३१ वाहनांवर कारवाई; १ लाख १२ हजारांचा दंड

नाकाबंदी दरम्यान १३१ वाहनांवर कारवाई; १ लाख १२ हजारांचा दंड

कळमनुरी पोलिसांची नाकाबंदी; १३१ वाहनांवर कारवाई करून १ लाख १२ हजारांचा दंड वसूल. विनाहेल्मेट, ट्रिपल सीट आणि परवान्याविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई.

Sep 21, 2026
शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीने पाठवली केवळ १० जनावरे!

शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीने पाठवली केवळ १० जनावरे!

कोरची शहरात शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला असून, चार-पाच वर्षांपासून निवेदने देऊनही समस्या कायम आहे. नगरपंचायतीने केवळ १० जनावरे गोशाळेत पाठवल्याने नागरिक संतप्त आहेत.

Sep 10, 2026