सर्वोच्च न्यायालय निर्देश

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

Vehicle E-challan: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात आलेला ई-चालानाचा दंड वेळेत न भरल्यास वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. बकाया वाहतूक दंडाची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

Vehicle E-challan

 

दंड वसुलीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिले राज्यांना निर्देश

नवी दिल्ली/ मुंबई (Vehicle E-challan) : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात आलेला ई-चालानाचा दंड वेळेत न भरल्यास वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. बकाया वाहतूक दंडाची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. दंडाची रक्कम प्रलंबित असलेल्या वाहनांचे नोंदणी नूतनीकरण, मालकी हस्तांतरण, पत्त्यात बदल, दुय्यम नोंदणी आणि फिटनेस प्रमाणपत्र यांसारख्या सेवांवर निर्बंध घालण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच अशा वाहनांना केंद्रीय परिवहन पोर्टलवर ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची कार्यवाही करण्यासही सांगण्यात आले आहे.

दंड भरल्याशिवाय मिळणार नाही PUC

प्रलंबित वाहतूक दंडाची रक्कम भरल्याशिवाय संबंधित वाहनाला प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) देऊ नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. वारंवार (Vehicle E-challan) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांचा परवाना नूतनीकरण रोखणे किंवा विद्यमान परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्याची मुभाही देण्यात आली आहे. न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने केवळ मोठ्या प्रमाणात ई-चालान (Vehicle E-challan) जारी करून उपयोग नसल्याचे नमूद केले. जारी करण्यात आलेल्या ई-चालानांपैकी मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम अद्याप वसूल झालेली नसल्याने दंडाच्या प्रत्यक्ष वसुलीवर भर देण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली.

रस्ते सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे निर्देश

वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वेगमापक यंत्रे आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करताना अतिरिक्त माल उतरवल्याशिवाय संबंधित वाहनाला पुढे जाऊ देऊ नये, असेही (Supreme Court) न्यायालयाने स्पष्ट केले. (Vehicle E-challan) मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित हा खटला 2012 पासून प्रलंबित असून, त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून देखरेख ठेवली जात आहे.

संबंधित सामग्री

वाहतूक यंत्रणेचा अजब कारभार! दुचाकीला सीटबेल्ट, कारला हेल्मेट!

वाहतूक यंत्रणेचा अजब कारभार! दुचाकीला सीटबेल्ट, कारला हेल्मेट!

Traffic System E-Challan: दुचाकीस्वाराला सीटबेल्ट न लावल्याबद्दल, तर कारचालकाला हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावल्याचा अजब प्रकार ओडिशात समोर आला आहे- नियंत्रक आणि महालेखापरीक्षक

Oct 05, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम आदेशास नकार देत निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तासांची मुभाही नाही; सुप्रीम कोर्टाचा संतुलित पर्यायाचा संकेत

दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तासांची मुभाही नाही; सुप्रीम कोर्टाचा संतुलित पर्यायाचा संकेत

दिवाळीच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण 24 तास वापराची मुभाही नाही. सुप्रीम कोर्टाने ठरावीक वेळेचा पर्याय सुचवत CPCB ला 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली.

Sep 30, 2026