औंढा नागनाथ पोलिस

राज्य रस्त्यावर पडलेली वाळू हटविण्याची पोलिसांवर आली वेळ

Aundha Nagnath Police: पोलिस निःरिक्षक शामकुमार डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील संकल्पनेने औंढा नागनाथ पोलिस ठाण्याने बोरजा फाट्यावर वाळू हटवून अपघातास अडचण घसलेली रस्त्याची सुरक्षितता सुधारली.

राज्य रस्त्यावर पडलेली वाळू हटविण्याची पोलिसांवर आली वेळ

Aundha Nagnath Police

औंढा नागनाथ (Aundha Nagnath Police) : औंढा नागनाथ ते हिंगोली या राज्य मार्गावरील बोरजा फाट्या जवळील वळण रस्त्यावर वाळू पडल्याने त्या वाळूवरून जाणारे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता होती. ही बाब नाकाबंदी दरम्यान पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या लक्षात येताच त्यांनी कर्मचार्‍यांना सोबत घेत अपघातास नियंत्रण देणारी रस्त्यावरील वाळू खोर्‍याच्या साह्याने बाजूला केली. पोलिसाच्या सतर्कतेने होणारे अनेक अपघात टळले आहेत त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.

बोरजा फाटा परिसरात १२ जून रोजी रात्री (Aundha Nagnath Police) औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, शाहेद सय्यद, अमोल चव्हाण, नागनाथ नजान, संतोष धनवे, वसंत चव्हाण नाकाबंदी दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस करताना बोरजा फाट्या जवळील वळण रस्त्यावर वाळू सांडल्याचे दिसून आले.

या वाळूवरून वाहन गेल्यास वाहन घसरून अपघात होण्याचा धोका होता ही बाब लक्षात येताच मोठ्या अपघातास निमंत्रण देणारी ही वाळू फावडा आणून पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, नागनाथ नजान, अमोल चव्हाण, वसंत चव्हाण, चालक संतोष धनवे यांनी हटवली त्यामुळे पुढे होणारे अपघात थांबले आहेत पोलिसांनी केलेल्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून होत आहे. rल केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेले केळीचे धड जमीनीवर कोसळले. कळमनुरी विधानसभा मतदार संघात आ. संतोष बांगर यांनी पाहणी करून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या.

संबंधित सामग्री

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

Aundha Nagnath Temple closed: औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या परिसरातील आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Oct 02, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाखांचा अपहार; चार जणांवर गुन्हा

गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाखांचा अपहार; चार जणांवर गुन्हा

गोळेगाव येथील जामियातुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 लाख 16 हजार रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी चार पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 24, 2026
चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादीस औंढा नागनाथ पोलिसांनी केला परत

चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादीस औंढा नागनाथ पोलिसांनी केला परत

Aundha Nagnath Theft Case: पोलीस ठाणे हद्दीतील पेरजाबाद शिवारातील नदीपात्रातून शेतकरी सुदाम मुंजाळ यांचा चोरट्याने दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी पाण्यातील पाच एचपी विद्युत मोटार पंप चोरून नेला होता.

Sep 09, 2026