Farmer Suicide

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Farmer Suicide

औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची तिसरी घटना

औंढा नागनाथ : तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे नापिकीमुळे एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी घडली.

मयत तानाजी विठोबा मोरे (वय ५९) हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या गावशिवारात सुमारे चार एकर शेती होती. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्जही होते.

यंदाच्या खरीप हंगामात मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी दिल्याने शेतातील पिकांची अवस्था बिकट झाली होती. त्यांचे सोयाबीन पीक डोळ्यासमोर वाळून गेल्याने ते चिंतेत होते. सततची नापिकी आणि यंदा हातातून जात असलेले पीक यामुळे त्यांनी शेतात फवारणीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन केले.

त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला.

तानाजी मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

औंढा नागनाथ तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती

माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती

Wildlife Drought: यंदाच्या पावसाच्या लहरीपणामुळे या परिसरालाही दुष्काळाची तीव्र झळ बसली आहे. त्याचा परिणाम केवळ शेतकरी आणि शेतीवरच नव्हे, तर जंगल परिसरातील वानरांसह विविध वन्यप्राणी व पक्ष्यांवरही..

Oct 06, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026