Hingoli Earthquake

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

Hingoli Earthquake

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात वारंवार भूगर्भातून येणारा गूढ आवाज आणि अधूनमधून जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यांमध्ये सर्वाधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

गेल्या २४ तासांत ३ पेक्षा जास्त तीव्रतेचे दोन धक्के नोंदवले गेले असून, त्यातील सर्वात मोठा धक्का ४.५ रिश्टर तीव्रतेचा आहे. हा धक्का आज, शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी हिंगोलीपासून आग्नेय दिशेला २० किलोमीटर अंतरावर नोंदवला गेला.

दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरातही आज सकाळी भूगर्भातून आवाजासह ३.३ तीव्रतेचा धक्का जाणवला.

२०२६ या वर्षापासून हिंगोली जिल्ह्यात २ पेक्षा जास्त तीव्रतेचे एकूण १९ धक्के नोंदवले गेले आहेत. यामध्ये ४ पेक्षा जास्त तीव्रतेचे ४ धक्के, ३ ते ४ तीव्रतेचे १४ धक्के आणि २ ते ३ तीव्रतेमधील एका धक्क्याचा समावेश आहे.

गेल्या १० वर्षांत ५० किलोमीटर परिसरात एकूण ५४ धक्के नोंदवले गेले असून, त्यापैकी ४२ धक्के हे ३ पेक्षा जास्त तीव्रतेचे आहेत.

सतत येणाऱ्या गूढ आवाजांमुळे आणि जमीन हादरण्याच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक ठिकाणी घरांना तडे गेल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आजच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी भूगर्भ तज्ज्ञांची पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

संबंधित सामग्री

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026