औंढा नागनाथ (Aundha Nagnath Theft Case) : पोलीस ठाणे हद्दीतील पेरजाबाद शिवारातील नदीपात्रातून शेतकरी सुदाम मुंजाळ यांचा चोरट्याने दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी पाण्यातील पाच एचपी विद्युत मोटार पंप चोरून नेला होता. याप्रकरणी फिर्यादी शेतकरी सुदाम नारायण मुंजाळ यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा ७२७/२६ कलम ३०३ (२) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या (Aundha Nagnath Theft Case) प्रकरणाचा पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रविकांत हरकळ यांनी काही दिवसातच तपास करून चोरट्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल पाच एचपी विद्युत मोटार पंप हा हस्तगत केला. व माननीय न्यायालयाच्या आदेशावरून दिनांक ९ सप्टेंबर रोजी पुण्यातील विद्युत पंप मुद्देमाल फिर्यादी शेतकरी सुदाम नारायण मुंजाळ यांना परत करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार राजेश ठाकूर, पोलीस जमादार रविकांत हरकळ, पोलीस शिपाई रमेश मस्के, ओंकारेश्वर रांजणेकर,महेश गरजे, बंडू आव्हाड यांची उपस्थिती होती. दरम्यान पावसाने खंड दिल्याने व सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना विद्युत पंपाची गरज असल्याने शेतकऱ्यास चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल तपासांती तात्काळ मिळाल्याने शेतकरी सुदाम मुंजाळ यांनी पोलीसा प्रति समाधान व्यक्त केले. तालुका प्रतिनिधी