राइड टू सेफ्टी

वाहन चालवण्याबद्दल जागरूकतेसाठी नागपूरमध्ये ‘राइड टू सेफ्टी’ रॅलीचे आयोजन

Ride to safety: आयसीआयसीआय लोम्बार्डकडून रस्ते सुरक्षेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित– सुरक्षितरित्या  वाहन चालवण्याच्या पद्धतींबद्दल जागरूकतेसाठी नागपूरमध्ये ‘राइड टू सेफ्टी’ रॅलीचे आयोजन

वाहन चालवण्याबद्दल जागरूकतेसाठी नागपूरमध्ये ‘राइड टू सेफ्टी’ रॅलीचे आयोजन

Ride to safety

मुलांना, पालकांना आणि वाहतूक पोलिसांना १,००० हेल्मेटचे वाटप
२०१५ पासून  १० लाखांपेक्षा अधिक भारतीयांशी थेट संवाद

नागपूर (Ride to safety) : 'आयसीआयसीआय लोम्बार्ड'ने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात नागपूर येथे ‘राईड टू सेफ्टी’ रॅलीचे आयोजन केले होते. नागपूर शहराच्या सन्माननीय महापौर नीता राजेंद्र ठाकरे आणि पोलीस उपायुक्त (वाहतूक) रश्मिता राव यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षा उपायांबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे.

शालेय विद्यार्थी आणि पालकांनी या (Ride to safety) रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. हेल्मेट वापरण्यासह रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याबाबत त्यांच्यात यावेळी जागरूकता निर्माण करण्यात आली. या उपक्रमांतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्डने संरक्षणात्मक साधनांचे महत्त्व आणि सुरक्षित प्रवासाच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल एक हजार हेल्मेटचे वाटप केले.

आयसीआयसीआय लोम्बार्ड रस्ते सुरक्षेसाठी कटिबद्ध असून जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसन अशा सर्वच स्तरांवर कार्य करते. पालकांमध्ये आणि मुलांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत वर्तणूक बदल घडवून आणण्यावर कंपनीने आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. यासाठी खास थेट संपर्क कार्यक्रमांचेसुध्दा आयोजन केले जाते, तसेच सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटसारख्या संरक्षणात्मक साधनांचे वाटप करून त्यांचे महत्वसुध्दा मनावर ठसविले जाते. 

अधिक धोका असलेल्या भागात अपघाती मृत्यू रोखण्यासाठी ही कंपनी ट्रॅफिक पोलिसांच्या सहकार्याने एकत्रित काम करते. तसेच, नोएडा आणि पाटणा येथील पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून अपघातग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे कामही करते. सप्टेंबर २०१५ मध्ये हा सामाजिक उपक्रम सुरू झाल्यापासून, कंपनीने जीवन सुरक्षित बनविणाऱ्या रस्ते सुरक्षा नियमांबद्दल जागरूकता निर्माण केली आहे, तसेच वाहन विम्याची गरज व महत्त्व अधिकाधिक  व्यक्तींना विषद करत १० लाखांहून अधिक लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. गत काही वर्षांत, आयसीआयसीआय लोम्बार्डने भारतात सुमारे सहा लाखांहून अधिक हेल्मेट्सचे वाटप केले आहे.

रस्ते सुरक्षा मोहिमेचा (Ride to safety) व्यापक दृष्टिकोन मांडलाना आयसीआयसीआय लोम्बार्डच्या मार्केटिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सीएसआर प्रमुख श्रीमती शीना कपूर म्हणाल्या, "आयसीआयसीआय लोम्बार्डसाठी 'रस्ते सुरक्षा' हा केवळ एक सामाजिक उपक्रम नसून, तो विमा व्यवसायाचा आणि मुख्य उद्देशाचा एक अविभाज्य भाग आहे. खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्यासाठी केवळ जनजागृती पुरेशी नसून तिचे रूपांतर लोकांच्या रोजच्या जबाबदार वर्तनात झाले पाहिजे. 'राईड टू सेफ्टी' या मोहिमेद्वारे कंपनी पालक आणि मुलांशी संवाद साधणे, हेल्मेट वाटप यासारख्या उपक्रमांतून रस्त्यावर उत्तरदायित्वाची संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे प्रयत्न केवळ जनजागृतीपुरते मर्यादित नसून त्यात सुरक्षित वाहन चालवण्याच्या पद्धतींसाठी पाठपुरावा करणे, अपघातप्रवण ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी अभियांत्रिकी उपाययोजना सुचविणे आणि अपघातग्रस्तांसाठी पुनर्वसन सहाय्य यांचाही समावेश आहे. प्रतिबंधात्मक उपायांद्वारे रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करणे आणि भारतीय रस्त्यांवर कायमस्वरूपी सकारात्मक बदल घडवून आणणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे."

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

Vehicle E-challan: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात आलेला ई-चालानाचा दंड वेळेत न भरल्यास वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. बकाया वाहतूक दंडाची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय

Oct 02, 2026
ई-चलनाकडे दुर्लक्ष केलंय? सुप्रीम कोर्टाने सुचवले १० कडक उपाय; वीज बिलापासून वाहन जप्तीपर्यंत पर्याय

ई-चलनाकडे दुर्लक्ष केलंय? सुप्रीम कोर्टाने सुचवले १० कडक उपाय; वीज बिलापासून वाहन जप्तीपर्यंत पर्याय

₹२० हजार कोटींच्या ई-चलन थकबाकीवर सुप्रीम कोर्टाच्या १० सूचना; RC, DL, PUC, Parivahan आणि वाहन जप्तीपर्यंत पर्याय.

Sep 29, 2026