हिंगोली हेल्मेट सक्ती

हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच सुरुवात, आता विनाहेल्मेट प्रवेश बंद

Hingoli Helmet Mandatory: रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करावे आणि नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी यासाठी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी एक महत्त्वाचा निर्णय

हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच सुरुवात, आता विनाहेल्मेट प्रवेश बंद

Hingoli Helmet Mandatory

 

पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांच्या आदेशानंतर प्रवेशद्वारा वर पोलिसांचा खडा पहारा

हिंगोली (Hingoli Helmet Mandatory) : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करावे आणि नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी यासाठी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या (Hingoli Helmet Mandatory) आदेशाची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी आणि शिपाई तैनात करण्यात आले आहेत. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराची तपासणी करून हेल्मेट असणाऱ्यांनाच आत प्रवेश दिला जात आहे.  या नियमातून कोणालाही सूट देण्यात आलेली नाही. पोलीस दलातील कर्मचारी असो किंवा कामानिमित्त येणारा सामान्य नागरिक, सर्वांनाच हा नियम लागू आहे. ज्यांच्याकडे हेल्मेट नाही अशा दुचाकीस्वारांना आपले वाहन कार्यालयापासून सुमारे 500 मीटर अंतरावर उभे करून पायी कार्यालयापर्यंत यावे लागत आहे.

सामान्य नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस दलाने स्वतःच्या कार्यालया पासूनच या शिस्तीला सुरुवात केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या या निर्णयामुळे 'कायद्याचे पालन आधी आम्हीच करतो' हा संदेश जनतेपर्यंत गेला आहे. त्यांच्या या शिस्तप्रिय आणि जनजागृतीपर उपक्रमाचे हिंगोलीतील नागरिक आणि कार्यालयात येणारे अभ्यागत सर्व स्तरातून कौतुक करत आहेत.

संबंधित सामग्री

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

Vehicle E-challan: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात आलेला ई-चालानाचा दंड वेळेत न भरल्यास वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. बकाया वाहतूक दंडाची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय

Oct 02, 2026
ई-चलनाकडे दुर्लक्ष केलंय? सुप्रीम कोर्टाने सुचवले १० कडक उपाय; वीज बिलापासून वाहन जप्तीपर्यंत पर्याय

ई-चलनाकडे दुर्लक्ष केलंय? सुप्रीम कोर्टाने सुचवले १० कडक उपाय; वीज बिलापासून वाहन जप्तीपर्यंत पर्याय

₹२० हजार कोटींच्या ई-चलन थकबाकीवर सुप्रीम कोर्टाच्या १० सूचना; RC, DL, PUC, Parivahan आणि वाहन जप्तीपर्यंत पर्याय.

Sep 29, 2026
हिंगोलीत गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचे कडक निर्देश; नियम मोडल्यास कारवाई

हिंगोलीत गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचे कडक निर्देश; नियम मोडल्यास कारवाई

हिंगोली शहर पोलिसांनी गणेशोत्सव २०२६ साठी सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप, मूर्तीची उंची, विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपक आणि सुरक्षेबाबत कडक निर्देश दिले आहेत.

Sep 12, 2026
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आता कडक कारवाई; ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द?

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आता कडक कारवाई; ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द?

Enforcement of Traffic Rules: वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेपर्वा वाहनचालकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत. चालकांवर पेनल्टी पॉईंट्सच्या आधारे कारवाई केली

Sep 09, 2026
लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सर्वांसाठीच!

लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सर्वांसाठीच!

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ५८ पोलीस अधिकारी व अंमलदारांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Aug 29, 2026