Helmet Compulsory

लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सर्वांसाठीच!

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ५८ पोलीस अधिकारी व अंमलदारांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सर्वांसाठीच!

५८ पोलिसांवर दंडात्मक कारवाई; सेवा पुस्तिकेतही होणार नोंद!

लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ५८ पोलीस अधिकारी व अंमलदारांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संबंधितांवर केवळ दंडात्मक कारवाई करून विषय संपविण्यात आलेला नसून, सदर कारवाईची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कोणत्या पोलीस ठाण्याअंतर्गत किती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, याचा तपशील देण्यात आलेला नाही.

लातूर जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पोलीस ठाण्यात दुचाकीवर येणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांनी हेल्मेट परिधान करूनच कर्तव्यस्थळी यावे. विनाहेल्मेट दुचाकीवर पोलीस ठाण्यात येणाऱ्या अधिकारी किंवा अंमलदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच त्याची सेवा पुस्तिकेत नोंद घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

“कायद्याची अंमलबजावणी करणारे आपण आहोत. त्यामुळे कायद्याचे पालन करण्याची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे,” ही भूमिका पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी सुरुवातीपासूनच घेतली आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीत लातूर पोलीस दल स्वतः उदाहरण निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.

१ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी

लातूर जिल्ह्यात दि. १ सप्टेंबर २०२६ पासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच हेल्मेट वापराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे.

हेल्मेट वापरण्यासाठी मोठा खर्च किंवा विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. एक जबाबदार नागरिक म्हणून दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करण्याची सवय अंगीकारणे एवढीच अपेक्षा आहे.

दि. १ सप्टेंबर २०२६ पासून लातूर जिल्ह्यात “दुचाकी चालवताना हेल्मेट अनिवार्य” ही सुरक्षिततेची संस्कृती रुजविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

Vehicle E-challan: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात आलेला ई-चालानाचा दंड वेळेत न भरल्यास वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. बकाया वाहतूक दंडाची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय

Oct 02, 2026