हिंगोली (Hingoli Rural Police Action) : शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून पुण्यातील आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील वाहनही जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष सुनील बगडीया (रा. विद्यानगर, हिंगोली) यांचा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय असून अकोला बायपास परिसरात त्यांचे स्काय सिरॅमिक्स नावाचे दुकान आहे. दुकानासमोर त्यांचा पांढर्या रंगाचा महिंद्रा पिकअप (क्र. एम.एच.-३८- ई ३१२९) उभा होता. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० ते २ ऑक्टोबर सकाळी ७ वाजेच्या दरम्यान हा पिकअप दुकानासमोरून गायब झाला. चौकशी केली असता दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली चावी फिर्यादीच्या संमतीशिवाय घेऊन वाहन नेल्याचे समोर आले.
या तक्रारीवरून गजानन आदिनाथ पवार (रा. बेलोरा, ता.जि. हिंगोली) याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीने २ ऑक्टोबर रोजी दुपारी फिर्याद दिली होती. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश वाघ यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ तपास सुरू केला.
पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले, पोलीस निरीक्षक श्रीदेवी वगे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब खोडवे, राम धुमाळे, सुरेंद्र लांडगे, वैजनाथ पवार, विठ्ठल सांगळे, अमोल पोले आणि राजानंद वाघमारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांनी तपास चक्र फिरवून पुण्यातील आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील वाहनही जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास हिंगोली ग्रामीण पोलीस करीत आहेत.
हिंगोली ग्रामीण पोलिस कारवाई
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद
Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hingoli Rural Police Action
टैग्स:
Hingoli Rural Police Action