बार्शीटाकळी रस्ते वाहतूक

जड वाहनाच्या वाहतुकीमुळेमुळे रस्त्याचा बट्ट्याबोळ

Barshitakli Road Transport: बार्शीटाकळी तालुक्यातील  पिंजरते निहिदा सावरखेड फाटा या रस्त्यावरून नवीन रस्त्याचे काम करण्याकरिता वाहतूक करत असलेल्या कंत्राटदाराच्या जड वाहनामुळे..

जड वाहनाच्या वाहतुकीमुळेमुळे रस्त्याचा बट्ट्याबोळ

Barshitakli Road Transport

बांधकाम व प्रादेशिक परिवहन विभाग ऊठला जनतेच्या जीवावर..!

एक नविनरस्ता करण्यासाठी दुसराचांगला रस्ता खराब करण्याचा प्रयत्न

बार्शीटाकली (Barshitakli Road Transport) : बार्शीटाकळी तालुक्यातील  पिंजरते निहिदा सावरखेड फाटा या रस्त्यावरून नवीन रस्त्याचे काम करण्याकरिता वाहतूक करत असलेल्या कंत्राटदाराच्या जड वाहनामुळे कोट्यावधी रुपये किमतीच्या कामाचा बट्ट्याबोर्ड झाल्याचे निदर्शनास येते. 

बार्शीटाकळी तालुक्यातील धाकली जमकेश्वरते टिटवा या रस्त्याचे नवीन काम गेल्या काही दिवसापासून चालू आहे. या (Barshitakli Road Transport) रस्त्यावर कामाचे साहित्य टाकण्यासाठी कंत्राटदाराच्याजड सहा ते दहा चाकी वाहनामुळे पिंजर सावरखेड ते निहीदा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याचा क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्याने धिंगाणा झाला आहे. वास्तविक पाहता सदर रस्त्याची वाहतूक क्षमता दहाटणाची असताना सदर कंत्राटदाराची वाहने या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त टनाची साहित्याची वाहतूक रात्रंदिवस सतत करत असल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाली खड्डे पडलेली आहेत. त्यामुळे सदर रस्त्यावरील अनेक ठिकाणी डांबरीकरणाचा थर उडालेला आहे. या रस्त्यावरून ये जा करताना शेकडो गावातील जनतेला कमालीचा त्रास होत असून मणक्याचे आजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप या भागातील जनतेचा आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाचा कारभार उठला जनतेच्या जीवावर.!
अकोलाचेप्रादेशिक परिवहन विभागाचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी कंत्राटदाराच्या आमिषाला बळी पडून  जड वाहनाला खुल्या परवानगी देण्यात आली असल्यानेच सदर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची हिम्मत वाढलेली आहे. सदर रस्त्यावरून रात्रंदिवस ये जा करणाऱ्याजड वाहतूक बंद करून  इतरत्र मार्गाने सदर रस्त्यावर साहित्य टाकण्याकरीता वळवावी. जेणेकरून पिंजरत नीहीदाते सावरखेड फाटाहा रस्ता सुरक्षित राहू शकेल.

विशेष म्हणजे बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांचे सुद्धा एक रस्ता करत असताना दुसरा रस्ता कंत्राटदाराच्या जड वाहनामुळे उखडत असल्याची जाणीव असल्यावरही बांधकाम विभागातील जबाबदार अधिकारी हे कंत्राटदाराला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. (Barshitakli Road Transport) एक नवीन रस्ता करण्यासाठी जुन्या अर्थात पूर्वी केलेल्या दुसऱ्या चांगल्या रस्त्या खराब तथासत्यानाश करण्याचा प्रयत्न बांधकाम विभागातील जबाबदार अधिकारी हे कंत्राट दाराच्या आमिषाला बळी पडून करत आहेत.अशा प्रकारचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय ठाकरे यांनी केला आहे.

संबंधित सामग्री

मानोरा शहराबाहेरून बायपास मंजूर करा! व्यापारी संघटनेचे राज्यमंत्री ना. नाईक यांना निवेदन

मानोरा शहराबाहेरून बायपास मंजूर करा! व्यापारी संघटनेचे राज्यमंत्री ना. नाईक यांना निवेदन

अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए वर वसलेले मानोरा हे महत्त्वाचे व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे.

Sep 04, 2026
हिंगोलीत जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग; हलक्या वाहनांना यू-टर्नची सुविधा 

हिंगोलीत जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग; हलक्या वाहनांना यू-टर्नची सुविधा 

Hingoli Transport Route: हिंगोली शहरात जाड व हल्क्या वाहनांना नवे मार्ग देण्यात आले आहेत. अकोला-वाशिममधून येणाऱ्या जड वाहनांची प्रवेश पद्धती बदलण्यासाठी सावरखेडा बायपास..

Aug 18, 2026
हिंगोली जिल्ह्यातील LIGO प्रकल्पाच्या रस्त्याच्या कामात तफावत; बाधित शेतकऱ्यांनी दिले निवेदन

हिंगोली जिल्ह्यातील LIGO प्रकल्पाच्या रस्त्याच्या कामात तफावत; बाधित शेतकऱ्यांनी दिले निवेदन

Hingoli LIGO Project: हिंगोली येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय लिगो प्रकल्पासाठी तयार होणाऱ्या मुख्य पोच रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचा आरोप करत दुघाळा, बोरजा आणि पिंपळ परिसर..

Aug 14, 2026
लातूर-औसा महामार्गावर पडल्या भेगा!

लातूर-औसा महामार्गावर पडल्या भेगा!

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील लातूर ते औसा रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत.

Aug 09, 2026
शिवसेनेचा पालिका आयुक्तांना 14 आगस्टपर्यंत अल्टिमेटम!

शिवसेनेचा पालिका आयुक्तांना 14 आगस्टपर्यंत अल्टिमेटम!

Latur Municipal Corporation: शहरात बांधकाम प्रकरणामध्ये कागदपत्रांची असत्यता आढळल्यास व नियमावलीतील अटींचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणांमध्ये अर्जदार/जागा मालक, संबंधित सल्लागार अभियंता/आर्किटेक

Jul 28, 2026