हिंगोली वाहतूक मार्ग

हिंगोलीत जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग; हलक्या वाहनांना यू-टर्नची सुविधा 

Hingoli Transport Route: हिंगोली शहरात जाड व हल्क्या वाहनांना नवे मार्ग देण्यात आले आहेत. अकोला-वाशिममधून येणाऱ्या जड वाहनांची प्रवेश पद्धती बदलण्यासाठी सावरखेडा बायपास..

हिंगोलीत जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग; हलक्या वाहनांना यू-टर्नची सुविधा 

Hingoli Transport Route

 

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय; एक महिन्यासाठी वाहतूक बदल लागू

हिंगोली (Hingoli Transport Route) : हिंगोली शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जड व हलक्या वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल ११ ऑगस्ट पासून एक महिना कालावधी करिता लागू राहणार आहे. अकोला-वाशिमकडून येणारी जड वाहने सावरखेडा ब्रिज सर्व्हिस रोड व खटकाळी बायपासमार्गे वळविण्यात येणार आहेत. हलक्या वाहनांना बासंबा फाट्यावरून यू-टर्न घेऊन शहरात प्रवेश करता येणार आहे.

जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता (भा.प्र.से.) यांनी मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ३३(१)(ख) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे निर्देश दिले आहेत. अकोला-वाशिमकडून हिंगोलीकडे येणारी ट्रक, बस व इतर जड वाहने शहरात प्रवेश करण्यापूर्वी सावरखेडा ब्रिज सर्व्हिस रोड व खटकाळी बायपासमार्गे वळविण्यात येतील. तसेच हिंगोली शहरातून अकोला-वाशिमकडे जाणारी जड वाहने खटकाळी बायपास रोड व सावरखेडा ब्रिज रोडमार्गे वळविण्यात येतील.

कार, दुचाकी व इतर हलक्या वाहनांना बासंबा फाट्यावर यू-टर्न घेऊन हिंगोली शहरात प्रवेश करता येईल. या वाहतूक बदलामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील जड वाहनांची वर्दळ कमी होऊन वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. वाहनचालकांनी निर्धारित पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.