Manora Bypass

मानोरा शहराबाहेरून बायपास मंजूर करा! व्यापारी संघटनेचे राज्यमंत्री ना. नाईक यांना निवेदन

अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए वर वसलेले मानोरा हे महत्त्वाचे व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे.

मानोरा शहराबाहेरून बायपास मंजूर करा! व्यापारी संघटनेचे राज्यमंत्री ना. नाईक यांना निवेदन

Manora Bypass

मानोरा : अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए वर वसलेले मानोरा हे महत्त्वाचे व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे. गेल्या काही वर्षांत शहरातून जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, विशेषतः जड वाहने, ट्रक आणि प्रवासी बस यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी मानोरा शहराबाहेरील परिसरातून जाणारा योग्य नियोजित बायपास रस्ता मंजूर करावा, अशी आग्रही मागणी करणारे निवेदन मानोरा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांना दिले.

व्यापारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानोरा शहरातून जाणारा हा एकच मुख्य रस्ता असल्यामुळे शहरातील सर्वच मोठे उत्सव याच रस्त्याने साजरे केले जातात. कावड यात्रा, श्रीराम नवमी मिरवणूक, संत सेवालाल महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बिरसा मुंडा जयंती, मोहरम, रहमान शाह बाबा संदल मिरवणूक, गणपती आणि दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक तसेच विविध राजकीय व सामाजिक उत्सव याच रस्त्याने साजरे केले जातात. त्यामुळे नेहमीच शहरात वाहतूक कोंडी होते व अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

जर शहराच्या बाहेरील परिसरातून बायपास रस्ता तयार झाल्यास शहरातील गर्दी कमी होईल, अकोला ते नांदेड या मार्गावरील वाहतुकीस गती मिळेल, प्रवासाचा कालावधी कमी होईल, अपघाताचे प्रमाण घटेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ही लोकांची दीर्घकालीन व अत्यंत आवश्यक मागणी असून, आपल्या हस्तक्षेपाने या प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

मंत्री यांना निवेदन देताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू गुल्हाने, संजय हेडा, पप्पू शेठ हेडा, गणेश भोयर, अरुण हेडा, असलम शेठ आदी उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने मानोरा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर व्यापारी व निवासी नागरिकांनी केलेले अतिक्रमण सात दिवसांत हटविण्याच्या नोटिसाही पाठविल्या आहेत. त्यामुळे शहरातील हा राष्ट्रीय महामार्ग चर्चेत आला आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026