Drowning Incident

गणरायाला निरोप देताना महाराष्ट्रात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; नांदेड आणि नंदुरबारमध्ये शोककळा

गणेश विसर्जनादरम्यान नांदेडमध्ये दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा आणि नंदुरबारमध्ये २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

गणरायाला निरोप देताना महाराष्ट्रात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; नांदेड आणि नंदुरबारमध्ये शोककळा

नांदेडमध्ये गोदावरीत दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; नंदुरबारमध्ये धरणात २६ वर्षीय तरुणाचा अंत

गणेश विसर्जनाच्या उत्साहाला महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या दुर्घटनांनी गालबोट लागले आहे. नांदेड आणि नंदुरबार जिल्ह्यांत विसर्जनासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नांदेडमध्ये गोदावरी नदीत दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा, तर नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात धरणातील पाण्याच्या डोहात २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तिन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

नांदेडमध्ये दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा मृत्यू

नांदेड शहरातील काळेश्वर परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. देगलूर तालुक्यातील किनी येथील १९ वर्षीय बजरंग येडूरे आणि मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील २० वर्षीय दीपक सोळूंखे अशी मृतांची नावे आहेत.

दोघेही नांदेड शहराजवळील वाडी पाटी येथील मातोश्री प्रतिष्ठान महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. रविवारी मित्रांसोबत गणरायाच्या विसर्जनासाठी ते काळेश्वर येथे गेले होते. यावेळी गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले.

घटनेनंतर दोन्ही तरुणांचा शोध घेण्यात आला. त्यांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

नंदुरबारमध्ये धरणातील पाण्यात तरुणाचा बुडून मृत्यू

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातही गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना घडली. कोठार येथील धरणावर गणरायाच्या विसर्जनासाठी गेलेल्या २६ वर्षीय प्रताप जिऱ्या पावरा यांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला.

प्रताप हे मेडिकल कॉलेजमध्ये मानधनावर कक्ष सेवक म्हणून कार्यरत होते. गणेश मंडळासोबत ते धरणावर विसर्जनासाठी गेले असताना ही घटना घडली. पाण्यात बुडाल्यानंतर त्यांना तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे संबंधित परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीतील धानोरा काळे येथे गणेश विसर्जनानंतर गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले. एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.

Sep 27, 2026
हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत यंदा १७१० ठिकाणी गणेश स्थापना झाली; मात्र ‘एक गाव एक गणपती’ची संख्या ३०५ वरून १९१ वर घटल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Sep 15, 2026
हिंगोलीत गणेशोत्सव २०२६ साठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन

हिंगोलीत गणेशोत्सव २०२६ साठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Sep 05, 2026
मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी;  तिघांचा बचाव

मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी; तिघांचा बचाव

नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंड परिसरात गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी उतरलेल्या चार मुलांना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याची घटना घडली.

Sep 05, 2026
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकचा ३५ हजार कोटींचा विकास आराखडा; फडणवीसांचा पायाभूत सुविधांवर भर

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकचा ३५ हजार कोटींचा विकास आराखडा; फडणवीसांचा पायाभूत सुविधांवर भर

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसराच्या विकासाला मोठी गती देण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे.

Aug 29, 2026