Hingoli Ganeshotsav 2026

हिंगोलीत गणेशोत्सव २०२६ साठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

हिंगोलीत गणेशोत्सव २०२६ साठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन

महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टलवरून करता येणार अर्ज; वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकूर यांचे आवाहन

हिंगोली : गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र पोलीसांच्या सिटीझन पोर्टलवरून ही अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व गणेश मंडळांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करून परवानगी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकूर यांनी केले आहे.

हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने या नव्या प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यासाठी आवाहन पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यापूर्वी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना परवानगीसाठी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज सादर करावा लागत होता. आता ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्याने ती अधिक सुलभ, पारदर्शक आणि पेपरलेस झाली आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया :

१. https://citizen.maharashtra.gov.in या सिटीझन पोर्टलला भेट द्या.
२. नवीन नोंदणी करून लॉगिन करा.
३. ‘परवानगी’ या विभागात जा.
४. ‘गणेशोत्सव २०२६ परवानगी अर्ज’ निवडा.
५. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.
६. अर्ज क्रमांक जतन करून अर्जाची स्थिती तपासा.

ऑनलाईन अर्ज प्रणालीमुळे गणेश मंडळांचा वेळ वाचणार असून परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. अर्जाची तात्काळ नोंदणी तसेच त्याची स्थिती ऑनलाईन तपासण्याची सुविधाही मंडळांना उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील तसेच हिंगोली शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी शेवटच्या क्षणाची प्रतीक्षा न करता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरून परवानगी प्रक्रिया पूर्ण करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस ठाणे हिंगोली (शहर) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

Hingoli Police Crime Case: तू आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Oct 01, 2026
वाहनावर दंड आकारल्याच्या कारणातून शहर वाहतुक शाखेच्या पोलिसाला मारहाण

वाहनावर दंड आकारल्याच्या कारणातून शहर वाहतुक शाखेच्या पोलिसाला मारहाण

Hingoli police assault case: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला गाडीवर दंड आकारल्याच्या रागातून लोखंडी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Sep 22, 2026
गणरायाला निरोप देताना महाराष्ट्रात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; नांदेड आणि नंदुरबारमध्ये शोककळा

गणरायाला निरोप देताना महाराष्ट्रात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; नांदेड आणि नंदुरबारमध्ये शोककळा

गणेश विसर्जनादरम्यान नांदेडमध्ये दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा आणि नंदुरबारमध्ये २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

Sep 21, 2026
हिंगोलीतील पोलिस वसाहतीची  सुरक्षा धोक्यात; पोलिस उपनिरीक्षकांच्या निवासस्थानी घरफोडी

हिंगोलीतील पोलिस वसाहतीची  सुरक्षा धोक्यात; पोलिस उपनिरीक्षकांच्या निवासस्थानी घरफोडी

Hingoli Police Colony Burglary: पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी चोर्‍यांचे सत्र सुरुच ठेवले आहे. शहरातील  नवीन पोलिस वसाहतीमधील पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी २ लाख ९४ हजार रुपयाचा ऐवज

Sep 15, 2026