Hingoli Ganeshotsav

हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

हिंगोलीत यंदा १७१० ठिकाणी गणेश स्थापना झाली; मात्र ‘एक गाव एक गणपती’ची संख्या ३०५ वरून १९१ वर घटल्याने चिंता व्यक्त होत आहे.

हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली

Hingoli Ganeshotsav

२०२५ मध्ये १४८९ ठिकाणी स्थापना, यंदा १७१० ठिकाणी; एक गाव एक गणपतीचा आकडा ३०५ वरून १९१ वर

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशाच्या स्थापनेला मोठा प्रतिसाद मिळाला असला, तरी ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणेशमूर्तींच्या एकूण स्थापनेत २२१ ने वाढ झाली आहे. मात्र, एक गाव एक गणपतीच्या संख्येत मोठी घट नोंदवली गेल्याने ऐक्याच्या या संकल्पनेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सन २०२५ मध्ये हिंगोली जिल्ह्यात १४८९ ठिकाणी श्रींची स्थापना झाली होती. त्यापैकी ३०५ ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला होता. यंदा म्हणजेच २०२६ मध्ये जिल्हाभरात १७१० ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, यापैकी केवळ १९१ गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना झाली आहे.

जिल्ह्यातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार गणेश स्थापनेची आकडेवारी पाहिल्यास विविध ठिकाणी स्थापना आणि एक गाव एक गणपतीच्या संख्येत फरक दिसून येतो.

हिंगोली शहर

हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी भागात १०४ गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. या सर्व १०४ मंडळांकडे परवाना आहे.

कळमनुरी

कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरी भागात १७ परवाना धारक आणि १० विना परवाना, अशी एकूण २७ मंडळांनी स्थापना केली. ग्रामीण भागात ९२ परवाना धारक आणि १० विना परवाना, अशी एकूण १०२ मंडळांनी श्रींची स्थापना केली. या पोलीस ठाणे हद्दीत एकूण १२९ ठिकाणी गणेश स्थापना झाली असून, त्यापैकी २० गावांमध्ये एक गाव एक गणपती आहे.

बासंबा

बासंबा पोलीस ठाण्याचा संपूर्ण भाग ग्रामीण आहे. येथे ९४ परवाना धारक आणि ११ विना परवाना, अशा एकूण १०५ ठिकाणी श्रींची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी २७ गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना झाली आहे.

हिंगोली ग्रामीण

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात ९० परवाना धारक आणि २० विना परवाना, अशा एकूण ११० ठिकाणी श्रींची स्थापना झाली आहे. यापैकी २० गावांमध्ये एक गाव एक गणपती आहे.

औंढा नागनाथ

औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीतील शहरी भागात १४ परवाना आणि ११ विना परवाना, अशी एकूण २५ ठिकाणी, तर ग्रामीण भागात १८१ परवाना आणि ९ विना परवाना, अशी एकूण १९० ठिकाणी स्थापना झाली आहे. शहरी व ग्रामीण भाग मिळून या ठाणे हद्दीत २१५ ठिकाणी श्रींची स्थापना झाली असून, जिल्ह्यातील सर्वाधिक स्थापना याच पोलीस ठाणे हद्दीत झाली आहे. येथे १४ गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

नर्सी नामदेव

नर्सी नामदेव पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात ७५ परवाना धारक आणि २३ विना परवाना, अशा एकूण ९८ ठिकाणी गणेश स्थापना झाली आहे. यापैकी ११ गावांमध्ये एक गाव एक गणपती आहे.

सेनगाव

सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत शहरी भागात ८ परवाना आणि २ विना परवाना, अशी एकूण १० ठिकाणी, तर ग्रामीण भागात १३३ परवाना आणि ५२ विना परवाना, अशी एकूण १८५ ठिकाणी श्रींची स्थापना झाली आहे. दोन्ही भाग मिळून येथे १९५ ठिकाणी गणेश स्थापना झाली असून १५ गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

गोरेगाव

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागात ९६ परवाना धारक आणि २३ विना परवाना, अशा एकूण ११९ ठिकाणी श्रींची स्थापना झाली आहे. येथे ९ गावांमध्ये एक गाव एक गणपती आहे.

वसमत शहर

वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीतील शहरी भागात १०४ मंडळांनी गणेशाची स्थापना केली असून, सर्व मंडळे परवाना धारक आहेत. या ठिकाणी एक गाव एक गणपतीची स्थापना झालेली नाही.

वसमत ग्रामीण

वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात ११६ ठिकाणी श्रींची स्थापना झाली असून, सर्व ११६ मंडळे परवाना धारक आहेत. यापैकी २२ गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

आखाडा बाळापूर

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात १४३ परवाना धारक आणि १० विना परवाना, अशी एकूण १५३ ठिकाणी गणेश स्थापना झाली आहे. जिल्ह्यात एक गाव एक गणपतीच्या सर्वाधिक ३७ स्थापना याच पोलीस ठाणे हद्दीत झाल्या आहेत.

कुरुंदा

कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात ७२ परवाना धारक आणि १९ विना परवाना, अशा एकूण ९१ ठिकाणी श्रींची स्थापना झाली आहे. यापैकी ७ गावांमध्ये एक गाव एक गणपती आहे.

हट्टा

हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात ११० परवाना धारक आणि ६१ विना परवाना, अशी एकूण १७२ ठिकाणी श्रींची स्थापना झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथे ९ गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना झाली आहे.

जिल्ह्याची एकूण आकडेवारी

संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचा विचार केला असता, शहरी भागात २४७ परवाना धारक आणि २३ विना परवाना, अशी एकूण २७० ठिकाणी गणेश स्थापना झाली आहे. तर ग्रामीण भागात १२०२ परवाना धारक आणि २३८ विना परवाना, अशी एकूण १४४० ठिकाणी स्थापना झाली आहे.

शहरी आणि ग्रामीण भागाची एकत्रित आकडेवारी पाहता जिल्हाभरात १७१० ठिकाणी श्रींची स्थापना करण्यात आली आहे.

शासन तसेच पोलीस प्रशासनाकडून ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला प्रोत्साहन देत आवाहन केले जात आहे. मात्र, यंदा गणेश स्थापनेच्या एकूण संख्येत वाढ होऊनही या संकल्पनेतील गावांची संख्या घटल्याने गावातील सामाजिक ऐक्याच्या उद्देशाला धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.

संबंधित सामग्री

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

Hingoli Police Crime Case: तू आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Oct 01, 2026
हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Sep 30, 2026
प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या घरी आनंदाची बातमी; गणेश चतुर्थीला मुलाचा जन्म

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या घरी आनंदाची बातमी; गणेश चतुर्थीला मुलाचा जन्म

जुबिन नौटियाल बाबा झाला! १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी मुलाचा जन्म झाला. आई आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती जुबिनने दिली.

Sep 29, 2026