Godavari River

परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीतील धानोरा काळे येथे गणेश विसर्जनानंतर गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले. एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.

परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

Godavari River

धानोरा काळे येथील गोदावरी पुलावरील घटना; एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम सुरू

पालम : धानोरा काळे येथे गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गणेश विसर्जन केल्यानंतर गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी धानोरा काळे येथील पुलावर सायंकाळी घडली. गजानन रामदासराव घोरपडे आणि मुंजाजी आश्रुबा घोरपड, रा. पालम, अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.

पोलीसांच्या माहितीनुसार, गणेश विसर्जन केल्यानंतर दोन्ही युवकांनी पोहण्यासाठी नदीपात्रातील पाण्यात उड्या मारल्या. यावेळी ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले.

दोन्ही युवकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले असून नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. पालम पोलीस ठाण्याचे पोनि. आदित्य लोणीकर, पोउपनि. प्रकाश लोखंडे आणि पोउपनि. तुळशीराम चिटेवार हे पोलीस पथकासह घटनास्थळी उपस्थित आहेत.

नदीतील पाण्याची खोली, प्रवाह आणि अडथळे लक्षात घेऊन एनडीआरएफ पथकाकडून विविध ठिकाणी शोध घेतला जात आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026