Philippines School Shooting

फिलिपिन्समध्ये शाळेत गोळीबार; विद्यार्थ्याने वर्गमित्राला ठार केल्यानंतर स्वतःवर झाडली गोळी

फिलिपिन्सच्या दक्षिणेकडील झाम्बोआंगा शहरात मंगळवारी शाळेच्या परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली.

फिलिपिन्समध्ये शाळेत गोळीबार; विद्यार्थ्याने वर्गमित्राला ठार केल्यानंतर स्वतःवर झाडली गोळी

झाम्बोआंगा शहरातील अ‍ॅटेनियो डी झाम्बोआंगा युनिव्हर्सिटीच्या हायस्कूलमध्ये थरारक घटना; हल्ल्याचे लाईव्ह स्ट्रिमींग केल्याचा संशय

फिलिपिन्सच्या दक्षिणेकडील झाम्बोआंगा शहरात मंगळवारी शाळेच्या परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. अ‍ॅटेनियो डी झाम्बोआंगा युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने दोन बंदुका घेऊन गोळीबार केला. या घटनेत त्याच वर्गातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत आणखी दोन जण जखमी झाल्याची माहिती एपीने दिली आहे.

झाम्बोआंगा शहराचे महापौर काइमर अदन ओलासो यांच्या माहितीनुसार, हल्लेखोराच्या अंगावर बॉडी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसेच तो संपूर्ण हल्ल्याचे लाईव्ह स्ट्रिमींग करत असल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने सर्वप्रथम एका शिक्षकाच्या दिशेने गोळीबार केला. मात्र या गोळीबारात शिक्षकाला गोळी लागली होती की नाही, हे तातडीने स्पष्ट झाले नाही. त्यानंतर त्याने एका विद्यार्थ्याला लक्ष्य केले. गोळी लागल्याने त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले.

घटनेनंतर अ‍ॅटेनियो डी झाम्बोआंगा युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अर्नाल्ड अँडाल यांनी परिसरातील परिस्थितीबाबत माहिती दिली. सध्या शाळेत गोळीबाराचा कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यानंतर आणखी कोणाचा मृत्यू किंवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठ प्रशासन या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. पुढील माहिती उपलब्ध होताच ती जाहीर केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही विद्यापीठाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे अर्नाल्ड अँडाल यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचा रॉयटर्सने हवाला दिला आहे.

फिलिपिन्समध्ये शाळेतील गोळीबाराची दुसरी मोठी घटना

फिलिपिन्समध्ये अलीकडच्या काळात शाळेत गोळीबाराची ही दुसरी मोठी घटना ठरली आहे. जूनमध्ये टॅक्लोबान शहरातील एका सरकारी हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थ्यांनी गोळीबार केला होता. त्या घटनेत किमान तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास 20 जण जखमी झाले होते.

दरम्यान, फिलिपिन्समधील या घटनेच्या केवळ दहा दिवस आधी थायलंडमध्येही शाळेत गोळीबाराची गंभीर घटना घडली होती. बँकॉकच्या बाहेरील भागातील एका शाळेत एका विद्यार्थ्याने गोळीबार केला होता. सलग घडलेल्या या घटनांमुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

संबंधित सामग्री

उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, ही शिक्षण विभागाची प्राथमिक जबाबदारी असताना उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे.

Aug 28, 2026
शाळा, कॉलेज आणि ट्युशन परिसरात छेडछाड करणाऱ्या मवाल्यांचा बंदोबस्त करा

शाळा, कॉलेज आणि ट्युशन परिसरात छेडछाड करणाऱ्या मवाल्यांचा बंदोबस्त करा

दुचाकीवरून मोकाट फिरणाऱ्या आणि मुलींना विनाकारण त्रास देणाऱ्या टवाळखोर मुलांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

Aug 27, 2026
नांदेडमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप; ५० वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेडमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप; ५० वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

Aug 21, 2026

अलिबागच्या शाळेत गुडघाभर पाण्यात ध्वजवंदन; धाकटे शहापूरमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अलिबागच्या शाळेत गुडघाभर पाण्यात ध्वजवंदन; धाकटे शहापूरमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करावे लागले.

Aug 16, 2026