Alibag School Waterlogging

अलिबागच्या शाळेत गुडघाभर पाण्यात ध्वजवंदन; धाकटे शहापूरमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करावे लागले.

अलिबागच्या शाळेत गुडघाभर पाण्यात ध्वजवंदन; धाकटे शहापूरमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Alibag School Waterlogging

पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने शाळेच्या आवारात जलमय स्थिती; २५ वर्षांपासून समस्या कायम

अलिबाग : स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करावे लागले. शाळेच्या परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांनी चिखल आणि पाण्यातच उभे राहून तिरंग्याला सलामी दिली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, शाळेतील मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

धाकटे शहापूर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम घेण्यासाठी विद्यार्थ्यांना याच पाण्यात उभे राहावे लागले. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या पायाखाली चिखल आणि साचलेले पाणी स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे शाळेच्या परिसरातील पायाभूत सुविधांची स्थिती पुन्हा चर्चेत आली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, शाळेच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह जाण्यासाठी असलेली जागा अडवली गेल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी प्रत्येक पावसाळ्यात शाळेच्या आवारात पाणी साचते. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो.

विशेष म्हणजे, ही समस्या आजची नसून मागील २५ वर्षांपासून कायम असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शालेय जीवनावर होतो. एवढ्या प्रदीर्घ काळापासून परिस्थिती कायम असूनही त्यावर अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना चिखल आणि पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करावे लागल्याने या समस्येचे गांभीर्य पुन्हा समोर आले आहे. शाळेच्या आवारातील पाण्याचा निचरा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाय कधी होणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

संबंधित सामग्री

मोडकळीस आलेल्या खोलीत बनते मध्यान्ह भोजन

मोडकळीस आलेल्या खोलीत बनते मध्यान्ह भोजन

गडचिरोलीतील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस आली असून, पडक्या खोलीत मध्यान्ह भोजन बनविले जात असल्याने पालकांमध्ये असंतोष आहे.

Sep 17, 2026
उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उदगीर तालुक्यातील ४८ जि.प. शाळांमधील १२६ वर्गखोल्या धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, ही शिक्षण विभागाची प्राथमिक जबाबदारी असताना उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे.

Aug 28, 2026
शाळा, कॉलेज आणि ट्युशन परिसरात छेडछाड करणाऱ्या मवाल्यांचा बंदोबस्त करा

शाळा, कॉलेज आणि ट्युशन परिसरात छेडछाड करणाऱ्या मवाल्यांचा बंदोबस्त करा

दुचाकीवरून मोकाट फिरणाऱ्या आणि मुलींना विनाकारण त्रास देणाऱ्या टवाळखोर मुलांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

Aug 27, 2026
नांदेडमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप; ५० वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेडमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप; ५० वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

Aug 21, 2026