Women Safety

शाळा, कॉलेज आणि ट्युशन परिसरात छेडछाड करणाऱ्या मवाल्यांचा बंदोबस्त करा

दुचाकीवरून मोकाट फिरणाऱ्या आणि मुलींना विनाकारण त्रास देणाऱ्या टवाळखोर मुलांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

शाळा, कॉलेज आणि ट्युशन परिसरात छेडछाड करणाऱ्या मवाल्यांचा बंदोबस्त करा

Women Safety

उपनगराध्यक्षा वैशाली खेडेकर यांची पोलिसांकडे मागणी

चिखली : शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच ट्युशन परिसरात दुचाकीवरून मोकाट फिरणाऱ्या आणि मुलींना विनाकारण त्रास देणाऱ्या टवाळखोर मुलांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी चिखली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. वैशाली कपिल खेडेकर यांनी ठाणेदार, पोलीस स्टेशन चिखली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, चिखली शहरातील शाळा व महाविद्यालयीन परिसर तसेच ट्युशन क्लासच्या भागात अनेक टवाळखोर मुले दुचाकीवरून फिरताना दिसतात. या मुलांकडून मुलींना नाहक त्रास दिला जात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी शाळा व महाविद्यालये भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत पोलीस गस्त किंवा बंदोबस्त तैनात करण्यात यावा. तसेच सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ट्युशन क्लास परिसरातही नियमित पेट्रोलिंग सुरू करावी, जेणेकरून अशा टवाळखोर मुलांवर आळा बसेल, अशी विनंती उपनगराध्यक्षा वैशाली खेडेकर यांनी केली आहे.

२७ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निवेदनातून पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026