ठाणे (Eknath Shinde ) : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक-मालक कल्याणकारी मंडळा’ची सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते शुक्रवारी ठाण्यात या मंडळाचा शुभारंभ करण्यात आला.
या माध्यमातून वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांसाठी ‘निवृत्ती सन्मान योजना’ सुरू करण्यात आली आहे. Eknath Shinde या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जाणार आहे. आतापर्यंत बँक खात्याची माहिती उपलब्ध असलेल्या सुमारे ७३५ लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने निधी दिला जाणार आहे.
विमा, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणालाही मदत
कल्याणकारी मंडळामार्फत केवळ निवृत्ती निधीच नव्हे, तर चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजना राबवल्या जाणार आहेत. यामध्ये जीवन विमा, कर्तव्य बजावताना अपंगत्व आल्यास विमा संरक्षण, आरोग्यविषयक मदत आणि कामाच्या वेळी दुखापत झाल्यास आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.
चालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आली आहे. दहावीमध्ये ७५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये, तर बारावीमध्ये ७५ टक्के गुण मिळविणाऱ्यांना ७ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.Eknath Shinde पदवी अभ्यासक्रमासाठीही गुणांच्या आधारे शैक्षणिक मदत देण्याची योजना आहे.
‘चालक केवळ प्रवासी वाहतूक करत नाहीत’
यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कोरोना काळात अनेक चालकांनी स्वतःचा धोका पत्करून रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे घरी पोहोचवणे, महिला व मुलांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देणे, अशा विविध प्रकारे चालक समाजासाठी योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नियमित नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळतो; मात्र रिक्षा-टॅक्सी चालकांचे उत्पन्न दैनंदिन मेहनतीवर अवलंबून असते. त्यामुळे वयाच्या ६५ वर्षांनंतर त्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, या मंडळाच्या माध्यमातून चालकांच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असून, विविध सामाजिक घटकांप्रमाणेच प्रवासी वाहतूक क्षेत्रातील कष्टकरी वर्गालाही सामाजिक सुरक्षेचे कवच देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.