Murder Investigation

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

Murder Investigation

कार्यालयात सात राऊंड फायरिंग; चार गोळ्या पूर्णेकरांना लागल्या, उर्वरित गोळ्यांपैकी एकामुळे मारेकरी जखमी झाल्याची पोलिसांना शक्यता

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांसमोर एक नवा संशय निर्माण झाला आहे. गोळीबाराच्या वेळी मारेकऱ्यांपैकीच एखादा आरोपी जखमी झाला असावा, या शक्यतेने ठाणे पोलिसांची गुन्हे शाखा तपास करत आहे. गोळी भिंतीवर किंवा कार्यालयातील एखाद्या वस्तूवर आदळून उलट दिशेने परत आली आणि आरोपीला लागली असावी, अशी एक शक्यता पोलिसांकडून पडताळली जात आहे. मात्र, ही केवळ तपासातील एक थिअरी असून त्याला अद्याप ठोस पुरावा मिळालेला नाही.

मानपाडा, आझाद नगर आणि मनोरमा नगर परिसरातील ठाकरे गटाचे कडवे कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून ओळख असलेल्या प्रदीप पूर्णेकर यांची गेल्या आठवड्यात मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी सुरुवातीला त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर पूर्णेकर जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मानेसह शरीरावर कोयत्याने वार करण्यात आले. हल्ल्यानंतर मारेकरी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले होते.

या हत्याकांडामुळे ठाण्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. आतापर्यंत पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. संतोष कनोजिया उर्फ टल्ली हा अद्याप फरार असून, आणखी एका मारेकऱ्याची ओळख पटलेली नाही. हा आरोपी हेल्मेट घातलेला असल्याने त्याची ओळख निश्चित करण्यात अडचणी येत आहेत.

कार्यालयातील सात राऊंड फायरिंगमुळे संशय

पोलिसांच्या तपासानुसार, प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात रिव्हॉल्व्हरमधून एकूण सात राऊंड फायर करण्यात आले होते. त्यापैकी चार गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. एका गोळीने त्यांच्या मानेतून आरपार प्रवेश केला, तर दुसरी गोळी छातीत अडकली. गंभीर दुखापतींमुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

आरोपी पप्या शिंदे याने इशारा केल्यानंतर इतर चार मारेकरी पूर्णेकर यांच्या कार्यालयात शिरले होते. हे कार्यालय आकाराने अत्यंत लहान असून, त्यामध्ये दोन ते तीन व्यक्ती बसू शकतील एवढीच जागा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे इतक्या कमी जागेत झालेल्या गोळीबाराचा तपास पोलिसांकडून बारकाईने करण्यात येत आहे.

सात राऊंडपैकी चार गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. उरलेल्या तीन गोळ्यांपैकी एका गोळीमुळे मारेकऱ्यांपैकीच एखादा आरोपी जखमी झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याच दिशेने आता तपास पुढे नेला जात आहे.

संतोष कनोजिया उर्फ टल्ली जखमी झाला का?

मारेकऱ्यांनी पूर्णेकर यांच्यावर अतिशय जवळून गोळीबार केला होता. त्यामुळे एखादी गोळी भिंतीवर किंवा कार्यालयातील अन्य वस्तूवर आदळून परत फिरली आणि आरोपींपैकी एखाद्याला लागली असावी, अशी शक्यता पोलिस तपासत आहेत.

या पार्श्वभूमीवर मारेकऱ्यांपैकी कोणी जखमी झाले असल्यास त्याने मुंबई किंवा ठाणे परिसरातील एखाद्या रुग्णालयात गुप्तपणे उपचार घेतले आहेत का, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. विशेषतः फरार असलेला संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला गोळी लागली होती का, याचाही तपास केला जात आहे.

मात्र, गोळी रिव्हर्स होऊन आरोपीला लागल्याची शक्यता अद्याप केवळ तपासाचा एक भाग आहे. याबाबत कोणतीही ठोस माहिती किंवा अधिकृत पुष्टी समोर आलेली नाही. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील प्रत्येक संभाव्य बाजू तपासण्यावर पोलिसांचा भर आहे.

घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे ताब्यात

हत्येनंतर शुक्रवारी पोलिसांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयाची सखोल पाहणी केली. फॉरेन्सिक पथकासह पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून संभाव्य पुरावे गोळा केले.

कार्यालयात रक्ताचे डाग आणि हत्येशी संबंधित अन्य खुणा आढळल्या. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करताना गोळीबारात वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या तसेच इतर महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आता अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळणारी माहिती, फरार संतोष कनोजिया उर्फ टल्लीचा शोध आणि घटनास्थळावरून मिळालेले फॉरेन्सिक पुरावे यांच्या आधारे या हत्याकांडाचा तपास पुढे नेला जात आहे. मारेकऱ्यांपैकी एखादा आरोपी गोळीबारात जखमी झाला होता का, याचे उत्तर तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; 9 विशेष पथके, 100 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; 9 विशेष पथके, 100 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून तिघांना अटक झाली आहे. CCTV, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू आहे.

Oct 03, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026